Homeसांस्कृतिकAstro Tips: आठवड्यातील 'या' दिवशी केस कापणे सर्वात शुभ, होईल भराभराट! चुकीच्या...

Astro Tips: आठवड्यातील ‘या’ दिवशी केस कापणे सर्वात शुभ, होईल भराभराट! चुकीच्या दिवशी कापल्यास गंभीर परिणाम


अ‍ॅस्ट्रो टिप्स : ज्योतिषशास्त्र असो किंवा वास्तूशास्त्र यात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींबद्दल नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमाचा पालन केल्यास आपल्या आयुष्यातील अनेक अडचणीवर आपण मात करु शकतो असं ते सांगतात. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. सोमवार हा महादेवाची आराधना करण्याचा दिवस असतो. ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे की, प्रत्येक कामासाठी एक योग्य वेळ असते. ज्याप्रमाणे आपण शुभ कामासाठी शुभ दिवस आणि मुहूर्त पाहतो. तसंच दैनंदिन जीवनातील कामासाठीही शुभ आणि अशुभ दिवस सांगण्यात आले आहेत. आज आपण आठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे हे शुभ आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत.

शक्यतो आपण सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी केस कापण्याचा कार्यक्रम ठेवतो. पण धार्मिक शास्त्रानुसार आठवड्यातील चुकीच्या दिवशी तुम्ही केस कापल्यास त्याचा अशुभ परिणाम तुमच्यावर होतो. तर योग्य दिवशी म्हणजेच शुभ दिवशी केस कापल्यास तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर धार्मिकशास्त्र काय सांगत पाहूयात.

कोणत्या दिवस केस कापण्यासाठी शुभ आणि कोणता अशुभ?

धार्मिक मान्यतेनुसार, अनेकंना रविवारच्या दिवशी केस कापण्याची सवय असते, त्याचं मुख्य कारण म्हणजे या दिवशी अनेकांना सुट्टी असते. पण ज्योतिशास्त्रानुसार रविवारच्या दिवशी केस कापणे अशुभ मानले गेले आहे. रविवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती खराब होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होतात.सोमवारचा दिवस चंद्राशी संबंधित असल्याने या दिवशी केस कापणे अशुभ मानले गेले आहे. जर तुम्ही सोमवारी केस कापल्यास तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील आणि घरामध्ये आर्थिक चणचण भासू शकते, असं मानलं जातं. तर मंगळवाच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चुकीच्या घटना घडतील असं सांगितलं गेलं आहे. त्यासोबतच रक्तासंबंधित आजार होण्याची शक्यता शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तर बुधवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला गेला आहे. बुधवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते. हिंदू धर्मामध्ये गुरूवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होतो असं सांगण्यात आले आहे. त्यासोबतच या दिवशी काही विशेष पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत मिळते. गुरूवारी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील अडथळे दूर होतात. शुक्रवारी केस कापल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते. शुक्रवारी केस कापल्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होते. त्यासोबतच तुम्हाला आर्थिक लाभ होतो. शनिवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमची सामाजिक आणि आर्थिक प्रगती होते. तुमच्यावर शनिदेवची कृपादृष्टी राहाते आणि तुमच्या कडे पैसाच पैसा येतो, असं शास्त्रात सांगण्यात आले आहे.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!