आयएनडी वि इंजिन टेस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England ) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत असून यातील पहिल्या सामन्यात भारताचा फलंदाज ऋषभ पंत यांनी दोन्ही इनिंगमध्ये शतक ठोकलं होतं. यानंतर ऋषभच सर्वत्र कौतुक सुद्धा झालं. तो भारताचा पहिला विकेटकिपर फलंदाज ठरला ज्याने टेस्ट सामन्यातील दोन्ही इनिंगमध्ये शतक ठोकलं. काही दिवसांपूर्वी ऋषभ पंत (Rishabh Pant) सोशल मीडियावर एक चर्चेचा मुद्दा बनला होता जेव्हा त्याला सुनील गावसकरने कॉमेंट्री दरम्यान ‘स्टुपिड’ म्हटलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
गावसकरांनी असं का म्हटलं होतं?
डिसेंबर 2025 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये चौथा टेस्ट सामना पार पडला होता. या सामन्यात महत्वाच्यावेळी खराब शॉट खेळून स्वस्तात विकेट गमावल्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर पंतवर संतापले. यानंतर त्यांनी ऋषभ पंतला तीनवेळा Stupid, Stupid, Stupid म्हणजेच मूर्ख असं म्हंटलं. गावसकरांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. गावसकरांच्या या शब्दाने पंतच्या हृदयावर घाव घातला.
हेही वाचा : कोणी हॉटेलच्या खोलीत पकडलं गेलं तर कोणी घरात घुसून केला कांड, बलात्काराच्या केसमध्ये फसलेत 5 दिग्गज क्रिकेटर
पंतने स्वतःला दिली शिक्षा :
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ऋषभ पंतने यानंतर स्वतःला शिक्षा देण्यास सुरुवात केली. त्याने आपला संपूर्ण फोकस प्रॅक्टिसवर ठेवला आणि कठोर ट्रेनिंग करण्याचा निर्णय घेतला. असं म्हटलं जातं की त्यानं आपला व्हाट्सअप अनइनस्टॉल केलं आणि आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोबाईल सुद्धा बंद केला.
कोचने केला खुलासा :
टीम इंडियाचे माजी स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग कोच सोहम देसाईने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, ‘त्याने दिवस रात्र अनेक सराव सत्र केले. ऋषभ पंत जेव्हा रिकामा असायचा तेव्हा मला जिममध्ये घेऊन जायचा. त्याला थकवा किंवा वर्क लोडची चिंता नव्हती. त्यानं एवढं सांगितलं की मला स्वतःवर काम करायचं आहे. शेवटच्या दिवशी, तो माझ्याकडे त्याच्या मनात एक प्रकारची कल्पना घेऊन आला आणि त्याने विचारले की तो एक दिवस सुट्टी घेऊ शकेल का? मी म्हणालो की त्याला तसं करण्याची गरज आहे. पंतकडे एवढं रिजर्व आहे की काही विशेष न करता तो किमान एक वर्ष ठीक राहू शकतो. हेच कारण आहे की हेडिंग्ले टेस्टमध्ये दोन शतके फलंदाजी ठोकून सुद्धा गोलंदाजी दरम्यान विकेटकिपिंग सुद्धा करू शकला.’






























