Homeमनोरंजनआमिर खानला अंडरवर्ल्ड दुबई पार्टीला आमंत्रण मिळाले

आमिर खानला अंडरवर्ल्ड दुबई पार्टीला आमंत्रण मिळाले


आमिर खानला अंडरवर्ल्डकडून आमंत्रण मिळाले: हिंदी चित्रपटसृष्टीत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत त्यानं त्याच्या खासगी आयुष्याविषयी आणि चित्रपटसृष्टीतील अनुभवांबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. या वेळी त्यानं एक असा किस्सा सांगितला, जेव्हा शूटिंगच्या सेटवर अंडरवर्ल्डचे काही लोक अचानक आले होते. आमिरनं सांगितलं की ते लोक त्याला एका पार्टीत बोलावण्यासाठी आले होते. तर, आमिरनं पार्टीत जाण्यास स्पष्ट  नकार दिला होता.

आमिरनं ही मुलाखत द लल्लनटॉपला दिली होती. आमिर खानला विचारलं की त्याला कधी अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली होती का? आमिरनं सांगितलं की त्याला अंडरवर्ल्डकडून कधी धमकी मिळाली नाही. तर आमिर खाननं सांगितलं की त्याला पार्टीसाठी आमंत्रण मिळालं होतं.

शूटिंग सेटवर आले अंडरवर्ल्डचे लोक

आमिर खाननं सांगितलं की त्याला अंडरवर्ल्डकडून कधीच थेट धमकी मिळाली नाही. पण, एकदा त्याला अंडरवर्ल्डच्या पार्टीसाठी निमंत्रण आलं होतं.

त्याने सांगितलं, ‘मला एकदा शारजाह किंवा दुबईकडच्या एखाद्या ठिकाणी पार्टीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण मी सरळ नकार दिला. नंतर काही लोक थेट माझ्या शूटिंग सेटवर आले आणि पार्टीला यायला आग्रह करू लागले.’

पैसे, काम सगळं देऊ, पण तरीही आमिरनं दिला नकार

आमिर म्हणाला, ‘त्यांनी मला सांगितलं की तू ये, हवं तेवढं मानधन देऊ, तुझ काही काम असेल तर तेही करून देऊ, फक्त तू ये. पण, मी स्पष्ट सांगितलं की मी नाही येणार.’

हेही वाचा : थिएटरच्या सीटच्या खाली 10 दिवसांच्या मुलीला कुरतडत होते किडे अन् उंदीर; बॉलिवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकानं घेतलं दत्त

पुढे आमिरनं सांगितलं, ‘जेव्हा मी वारंवार नकार दिला, तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत बदलली. ते मला म्हणाले, ‘तुला यावं लागेल कारण आधीच जाहीर केलंय की तू येणार आहेस, आता प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.त्यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही गेल्या महिन्याभरात मला सतत भेटताय आणि मी तेवढ्याच ठामपणे नकार देतोय. मी नाही येणार. तुम्ही खूप ताकदवान आहात, मला मारू शकता, हात-पाय बांधून घेऊन जाऊ शकता, पण मी स्वतःहून येणार नाही. हे ऐकल्यानंतर त्यांनी पुन्हा माझ्याशी संपर्कच केला नाही.’





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!