Homeदेश-विदेशकोलकाता बलात्काराचा आरोपित वडिलांनी दोषी आढळल्यास आपल्या मुलाची कठोर शिक्षा मागितली

कोलकाता बलात्काराचा आरोपित वडिलांनी दोषी आढळल्यास आपल्या मुलाची कठोर शिक्षा मागितली


कोलकाता बलात्कार: कोलकाता पोलिसांनी दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. याआधी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर 25 जूनला बलात्कार झाला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात सुरक्षारक्षक पिनाकी बॅनर्जी कॅम्पसमध्ये उपस्थित होता अशी माहिती समोर आली आहे. आरोपींच्या सांगण्यावरुन तो विद्यार्थिनीला गार्ड रुममध्ये एकटीला सोडून निघून गेला होता.

पोलिसांनी सांगितलं आहे की, मुलीने वारंवार विनंती करुनही सुरक्षारक्षकाने तिची मदत केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकाने कॉलेज प्रशासन किंवा पोलिसांना याची माहिती देणं अपेक्षित होतं, पण त्याने तसं केलं नाही. चौकशीदरम्यान त्याचा हलगर्जीपणा उघड झाला आणि नंतर बेड्या ठोकण्यात आल्या.

मुख्य आरोपी मोनोजित मिश्रावर 24 वर्षीय विद्यार्थिनीला 25 जूनच्या रात्री गार्डच्या रुममध्ये कित्येक तास मारहाण केल्याचा आरोप आहे. मोनोजित हा कॉलेजच्या तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या युनिटचा माजी अध्यक्ष आहे आणि तो तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेच्या दक्षिण कोलकाता शाखेचा संघटनात्मक सचिव असल्याचे वृत्त आहे. इतर दोन विद्यार्थी खोलीत उभे होते आणि गुन्हा घडताना पाहत होते.

दरम्यान तीन आरोपींपैकी एकाच्या वडिलांनी एएनआयशी संवाद साधताना म्हटलं आहे की, “आधी मी भारताचा नागरिक आहे, यानंतर बाप आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून, पोलीस तपास करत आहेत. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. जर माझा मुलगा यात सहभागी असेल तर त्याला कठोर शिक्षा व्हावी. आमचा कोलकाता पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. निर्दोष असेल तर सुटका होईल”.

पीडित विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, महाविद्यालयाचे मुख्य गेट बंद होते आणि सुरक्षा रक्षकाला खोलीबाहेर बसवण्यात आले होते. घटनेच्या वेळी सुरक्षारक्षक घटनास्थळी उपस्थित होता, तरीही त्याने हस्तक्षेप केला नाही असा आरोपही तिने केला आहे. मुख्य आरोपी मोनोजित मिश्राला 25 जून रोजी अटक करण्यात आली होती, तर सह-आरोपी 19 वर्षीय प्रथम वर्षाचा विद्यार्थी झैब अहमद आणि दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी प्रमित मुखर्जीला 26 जून रोजी अटक करण्यात आली होती.

पीडितेने काय आरोप केले?

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सुरक्षा रक्षकाच्या खोलीत बलात्कार होत असताना इतर दोन आरोपी उभे राहून पाहत होते अशी माहिती दिली आहे. गुरुवारी संध्याकाळी मुलीने तक्रार दाखल केली असून त्यात दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या बैठकीनंतर संध्याकाळी 7.30 वाजता तीन आरोपींनी- ज्यांना ती फक्त ‘J’, ‘M’ आणि ‘P’ या आद्याक्षरांनी ओळखत होती – तिला घेरलं. तिने म्हटलं आहे की ‘M’ आणि ‘P’ ने तिला ‘J’ असलेल्या खोलीत कोंडले आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

“मी त्यांना लढा दिला, मी रडले आणि मला सोडून देण्याची विनंतीही केली. मी त्यांच्या पायाही पडले, पण त्यांनी जाऊ दिलं नाही,” असं पीडितेने पोलिसांना सांगितलं. “लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतूने त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मी त्यांना सतत मागे ढकलत होते. मी हे करु शकत नाही, माझा प्रियकर आहे आणि माझं त्यावर प्रेम आहे सांगत होते,” असंही तिने म्हटलं.

‘मला पॅनिक अॅटक आला’

माझ्यावर अत्याचार होत असताना, मला पॅनिक अटॅक आला. मी त्यांच्याकडे इनहेलरदेखील मागितला होता अशी माहिती तिने दिली आहे. “मला पॅनिक अटॅक आला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. मग ‘जे’ ने ‘एम’ आणि ‘पी’ ला आत येण्यास सांगितले. मी मदत मागितली पण ते मला मदत करत नव्हते. मग मी त्यांना माझ्यासाठी इनहेलर आणायला सांगितलं. ‘एम’ ने ते आणलं. मी ते घेतल्यानंतर बरं वाटलं,” असं ती म्हणाली आणि पोलिसांना सांगितलं की तिने बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पण पीडितेच्या माहितीनुसार, आरोपींनी तिला पकडलं आणि हल्ला सुरुच ठेवला. मुख्य गेट लॉक होता आणि सुरक्षारक्षकानेही मदत केली नाही असंही ती म्हणाली आहे. तिने सांगितलं की तिला नंतर गार्डच्या खोलीत नेण्यात आले (गार्डला बाहेर काढण्यात आलं). जिथे “‘जे’ ने माझे कपडे उतरवले आणि माझ्यावर बलात्कार करायला सुरुवात केली. मी विरोध केला असताना त्याने मला ब्लॅकमेल केलं. जर कोणाकडे वाच्यता केली तर कुटुंब आणि प्रियकराला मारुन टाकू असं त्यांनी धमकावलं होतं असं तिने सांगितलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!