Homeदेश-विदेशराजनाथ सिंह शांघाय सहकार संघटनेच्या दस्तऐवजावर पाकिस्तान चीन स्नूब पहलगम म्हणून स्वाक्षरी...

राजनाथ सिंह शांघाय सहकार संघटनेच्या दस्तऐवजावर पाकिस्तान चीन स्नूब पहलगम म्हणून स्वाक्षरी करण्यास नकार म्हणून मोदी सरकारला उधव ठाकरे शिवसेना यांनी मोदी सरकारला स्लॅम केले.

देश-विदेश : राजनाथ सिंग यांनी एससीओ दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला: शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत भारताने घेतलेल्या भूमिकेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. “भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या किंगदाओ, मुक्काम पोस्ट चीन येथे आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत त्यांनी भाग घेतला. दहशतवादविरोधातील भारताची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. या परिषदेत पाकिस्तानचे संरक्षणमंत्रीही उपस्थित होते. आपले संरक्षणमंत्री पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना भेटले नाहीत, बोललेही नाहीत, त्यांच्याकडे पाहिलेही नाही अशा बातम्या गोदी मीडियाने केल्या. यामुळे काय फरक पडला? राजनाथ सिंह यांनी त्यांची भूमिका ठामपणे मांडली म्हणजे काय? दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली. राजनाथ सिंह हे सर्व कोड्यात बोलले. त्यांनी कोणत्याच देशाचे नाव घेतले नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

हे चीनने दहशतवादाला पाठिंबा देण्यासारखे आहे

“भारतातील दहशतवादाचा सूत्रधार पाकिस्तान आहे व त्या दहशतवादास पाठबळ देणारा चीन आहे. राजनाथ सिंह यांनी या दोन्ही राष्ट्रांचे नाव घेऊन खडे बोल सुनवायला हवे होते. या परिषदेत दहशतवादाविरुद्ध एक ठराव मंजूर केला, पण पाक पुरस्कृत सीमापार दहशतवादाविरोधात स्पष्ट भूमिका नसल्याने संयुक्त निवेदनावर सही करण्यास राजनाथ यांनी नकार दिला. याउलट पाकिस्तानातील बलुचिस्तानात सुरू असलेल्या हिंसाचारावर चीनच्या बैठकीत चर्चा झाली, पण पहलगामवर चिंता व्यक्त झाली नाही. शांघाय सहकार्य संघटनेचे हे कार्य योग्य नाही. शांघाय सहकार्य संघटना ही पाक पुरस्कृत दहशतवाद सहकार्य संघटना आहे काय? असा प्रश्न त्यामुळे पडतो,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. “जम्मू-कश्मीरातील पहलगामचा हल्ला जगाला हादरवणारा आहे. या दहशतवादाचा धिक्कार संपूर्ण जगाने केला, पण या परिषदेत त्यावर मौन बाळगणे याचा अर्थ यजमान देशाने दहशतवादाला पाठिंबा देण्यासारखे आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं चीनवर निशाणा साधताना म्हटलं आहे.

…त्यामुळे पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्र्यांच्या दहशतवादाविरोधी वल्गनांना आंतरराष्ट्रीय मंचावर महत्त्व उरले नाही

“बलुचिस्तानातील दहशतवादाचा निषेध शांघाय परिषदेत केला जातो, पण पहलगाम हल्ल्यास महत्त्व दिले जात नसेल तर हे असे का घडत आहे, याचा गांभीर्याने विचार भारताने करायला हवा. गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान मोदी विशेष विमानाने जगभरात फिरत राहिले. चीनला गेले. चीनच्या राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत झोपाळ्यावर बसवले. सर्व खेळ केले ते स्वतःच्या चमकोगिरीसाठी, पण देशाच्या परराष्ट्र धोरणाने मात्र प्रत्येक बाबतीत मातीच खाल्ली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पंतप्रधानांचे पाणी जोखल्याचा हा परिणाम आहे. पहलगाम हल्ला झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी या हल्ल्याचा वापरही त्यांच्या राजकीय फायद्यासाठीच केला. 26 महिलांचे कुंकू पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी पुसले. त्यामुळे भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. पाकिस्तानवर आपल्या सैन्याने हवाई हल्ले केले व भारतीय सैन्य जोशात असतानाच अमेरिकेचे प्रेसिडंट ट्रम्प यांच्या दबावामुळे पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवून शरणागतीचा पांढरा झेंडाच फडकवला. त्यामुळे पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्र्यांच्या दहशतवादाविरोधी वल्गनांना आंतरराष्ट्रीय मंचावर महत्त्व उरले नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

आदळआपट करून काय साध्य होणार?

“भारताच्या सार्वभौमत्वाची ही शरणागती आहे. तरीही मोदी व त्यांचे लोक ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय विजयोत्सव साजरा करीत राहिले. जगात तो थट्टेचा विषय बनला. अशा सरकारच्या भूमिकांना आता जगात काय महत्त्व मिळणार? पाकिस्तान हा आपला लाडका देश असल्याचे प्रेसिडंट ट्रम्प यांनी जाहीर केले. चीनने पाकिस्तानला मांडीवरच घेतले. प्रेसिडंट ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘खाना’ दिला यावर भारताकडून निषेधाचा शब्द निघाला नाही. मग शांघायच्या सहकार्य परिषदेत आदळआपट करून काय साध्य होणार?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

इराणकची लुडबुड करणाऱ्या अमेरिकेला चपराक

“मुळात भारत दहशतवादाचा सगळ्यात मोठा शिकार आहे. दहशतवादाविरुद्धची लढाई भारत 70 वर्षांपासून लढत आहे. या लढाईस निर्णायक वळण मिळत असताना अमेरिकेच्या दबावाखाली ही लढाई थांबवणे योग्य नव्हते. इराण-इस्रायल युद्धात इराणसारख्या राष्ट्राने मध्ये लुडबुड करणाऱ्या अमेरिकेला चपराक मारली. अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने सरळ हल्ले केले. रशिया-युक्रेन युद्धातही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा दबाव मान्य केला नाही. मग पंतप्रधान मोदींनाच प्रेसिडंट ट्रम्प यांचा दबाव मान्य करून दहशतवादाविरुद्धचे युद्ध थांबवावे असे का वाटले? या सगळ्या माघार प्रकरणाचा परिणाम भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेवर झाला. जग लढणाऱ्यांपुढे झुकते व तडजोडी करणाऱ्यांना ते किंमत देत नाही. मोदी वगैरे नेते भारतात मोठ्या गर्जना करतात, पण प्रेसिडंट ट्रम्प यांच्या समोर माघार घेतात. त्याचा परिणाम शांघायच्या सहकार्य परिषदेत दिसला. राजनाथ सिंह पाक, चीनवर बोलत राहिले, पण उपयोग काय?” असा सवाल लेखाच्या शेवटी ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!