महाराष्ट्र (मुंबई) :6 जुलै रोजी एमएनएस मोर्चा: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही शाळेत हिंदी शिकवण्यावरुन मौन बाळगलेल्या मराठी कलावंतांना लक्ष्य केलं आहे. शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केली आहे. 6 जुलैला गिरगाव ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. राज ठाकरेंनी या मोर्चात कोण सहभागी हो नाही हे पाहतो सांगत कलावंतांनाही इशारा दिला आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मराठी माणसाचा मोर्चा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिकाशी बोलणार आहोत. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सरकाराला कळू दे. महाराष्ट्राने आपली संपूर्ण ताकद दाखवावी. सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरुन हा मोर्चा निघेल, विद्यार्थी, आणि पालकांना येता येईल यासाठी रविवार निवडला आहे. सर्व राजकीय पक्षांशी मी बोलणार आहे. महारष्ट्रातील प्रत्येकाने यात सहभागी व्हावं. महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा जो कट आहे त्याविरोधात सर्व मराठी लोकांनी मोर्चात सहभागी व्हावं अशी विनंती आहे”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
‘कोण येत नाही पाहतो’
“मोर्चात कोणताही झेंडा नाही त मराठी अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी मराठी बांधवांनी मोर्चात सहभागी होऊन, विरोध दर्शवावा. राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण सहभागी होतं आणि कोण येणार नाही हेदेखील मला पाहायचं आहे. महाराष्ट्र, मराठी माणसाच्या दृष्टीकोनातू ही महत्त्वाची लढाई आहे. यात संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं,” असं आवाहन राज ठाकरेंनी कलं आहे.
“अनेक लोक मीडियामधून मराठीवर बोलत असतात, पण मोक्याच्या क्षणी येत नाहीत. असे लोक पाहायचे आहेत, त्यात काही कलावंतही असतील. मी बोलण्यावर न बोलणारेही व्यक्त होतील,” असं राज ठाकरे म्हणाले. सरकारला सुबुद्दी देवो यासाठी विठ्ठलाला साकडं घालेन असंही उपहासात्मकपणे सांगितलं.
सामनातूनही कलावंतांवर निशाणा
“फडणवीस वगैरे लोकांच्या दबावाखाली तथाकथित मराठी भाषेचे लेखक, कलाकार मंडळी गुदमरून गेली किंवा सरकारचे लाभार्थीच बनल्याने ‘लाडक्या बहिणी’प्रमाणे हे सर्व लोक लाडके कलावंत, लाडके लेखक बनले आहेत. आता कवी हेमंत दिवटे यांनी या हिंदी सक्तीला विरोध म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करण्याचे ठरवले आहे. अर्थात भाजप काळात जे ‘पद्म’ पुरस्काराचे वगैरे लाभार्थी बनले, ‘हे भूषण’ किंवा ‘ते भूषण’ पुरस्काराचे मानकरी बनले असे ‘मराठी’ शिलेदार मात्र या आक्रमणाविरुद्ध तोंडे शिवून बसले आहेत. म्हणजे नाना पाटेकरांपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत आणि सचिन तेंडुलकरपासून ते सुनील गावसकरांपर्यंत सगळ्याच मराठीजनांनी या सक्तीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, पण हे सर्व पडले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोक. मराठी कुशीत जन्माला आले, पण शेवटी जगाचे झाले. त्यामुळे मायभाषेचे मुसळ केरात गेले तरी चालते,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.





























