Homeमनोरंजनसायबर क्राइम कॉलरट्यूनसाठी अभिनेता ट्रोल केल्यामुळे अमिताभ बच्चन एक्स वापरकर्त्यावर परत आला

सायबर क्राइम कॉलरट्यूनसाठी अभिनेता ट्रोल केल्यामुळे अमिताभ बच्चन एक्स वापरकर्त्यावर परत आला


अमिताभ बच्चनने परत ट्रॉल्सला हिट केले: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सध्या अमिताभ बच्चन यांच्या रडारवर त्यांचे ट्रोलर्स असून ते कोणालाही सहज माफ करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीयेत. यापूर्वी कधीही ट्रोलर्सना उत्तर न देणारे अभिताभ आजकाल सोशल मीडियावर त्यांचा चांगलाच समाचार घेताना दिसत आहेत. ट्रोलिंग करणाऱ्यांना अमिताभ त्यांच्याच भाषेत आणि थेट उत्तरं देत आहेत. अलिकडेच त्यांनी त्यांच्या आवाजातील व्हायरल कॉलरट्यूनसाठी ट्रोल करणाऱ्याची बोलती बंद केल्याचं पाहायला मिळालं.

अनेकांनी कॉलरट्यूनसंदर्भात केलीये तक्रार

ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की, अमिताभ यांची व्हायरल कॉलरट्यून ही देशातील प्रत्येक व्यक्तीने एखाद्याला फोन केल्यानंतर रिंग वाजण्याआधी ऐकू येते. नागरिकांना सायबर गुन्हे आणि फसवणुकीबद्दल जागरूक करणारा एक प्रीरेकॉर्ड केलेला संदेश सरकारकडून बंधनकारक करण्यात आल्यामुळे प्ले केला जातो. मात्र हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरु असून आता इंटरनेटवर यासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे. आता हा प्रकार पुन्हा पुन्हा तोच तोचपणा असल्यासारखा आहे. अनेकांनी आणीबाणीच्या वेळी आणि आपत्कालीन कॉल करायचा असेल तर आधी हे ऐकत बसावं लागत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना हा प्रकार त्रासदायक ठरू शकतो असं परखड मत मांडलंय.

अमिताभ यांच्या पोस्टवर एकाने मांडला कॉलरट्यूनसंदर्भातील मुद्दा अन् मग…

सोमवारी, अमिताभ यांनी त्यांच्या एक्स हँडलवर सहज एक ट्विट केले. “जी हाँ हुजूर, मैं भी एक प्रशंसक हूं… तो??” अशी पोस्ट अमिताभ यांनी केलेली. या पोस्टवर एका युझरने अभिनेत्याला ट्रोल करण्यासाठी रिप्लाय दिला. “तो फोन पे बोलना बंद करो भाई,” असं हा युझर म्हणाला. मात्र सध्या अमिताभ ज्या मूडमध्ये आहेत त्यानुसार ते आता गप्प बसणाऱ्यांमधले राहिलेले नाहीत. बिग बींनी देखील कॉलरट्यूनसंदर्भात घेतल्या जाणाऱ्या या सातत्याच्या आक्षेपाची चर्चा कायमची थांबवण्याचा निर्णय घेत खोचक रिप्लाय केला. “भावा, सरकारला सांगा, त्यांनी आम्हाला जे करायला सांगितले ते केले,” असं उत्तम अमिताभ यांनी दिलं.

मरणाबद्दल बोलणाऱ्याला टोला

मध्यंतरी एका ट्रोलरने अमिताभ यांना वेळेत झोपत जा नाहीतर दिर्घायुष्य लाभणार नाही, असा सल्ला दिला होता. यावरही अमिताभ यांनी रिप्लाय केलेला. “माझ्या मरणासंदर्भात भाष्य केल्याबद्दल धन्यवाद, ही ईश्वराची कृपा आहे,” असं अमिताभ या पोस्टला रिप्लाय करता म्हणालेले. ही पोस्टही चांगलीच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालेलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!