Homeदेश-विदेशएअर इंडिया फ्लाइट एआय 130 लंडन हीथ्रो ते मुंबई ते 5 प्रवासी...

एअर इंडिया फ्लाइट एआय 130 लंडन हीथ्रो ते मुंबई ते 5 प्रवासी 2 क्रू सदस्य बेशुद्ध

देश विदेश  : एअर इंडिया लंडन फ्लाइट न्यूज: एअर इंडियाच्या विमानात पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  लंडनहून मुंबईत येणा-या विमानातील  पाच प्रवासी, दोन केबिन क्रू बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे. मुंबईत या विमानाचे लँडिंग झाले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अमदाबाद लंडन विमान दुर्घटनेत 242 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे दुर्घचनाग्रस्त विमान एअर इंडियाचे होते. यानंतर एअर इंडियाच्या विमानांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.

AI130 हे विमान लंडन हीथ्रोहून मुंबईला येत होते. या प्रवासा दरम्यान विमानात, पाच प्रवाशांनी आणि दोन कर्मचाऱ्यांनी उड्डाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चक्कर येणे आणि मळमळ होणे अशी तक्रार नोंदवली. मुंबई विमानतळावर या प्रकाराची माहिती देण्यात देण्यात आली.  मुंबई विमानतळावर  AI130 या विमानाचे सुरक्षित लँडिग करण्यात आले.  विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरल्यानंतर  वैद्यकीय पथक तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी सज्ज होते अशी माहिती मुंबई विमानतळ मॅनेजमेंटकडून देण्यात आली.

विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर  दोन प्रवाशांना आणि दोन केबिन क्रू, ज्यांना अजूनही अस्वस्थ वाटत होते, त्यांना पुढील तपासणीसाठी वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत आणि नियामकाला योग्यरित्या कळवले आहे.” – एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी सांगितले.  प्रवासी तसेच क्रू मेंबर यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

‘एअर इंडिया’ च्या बोईंग 787 विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार घडला. ही घटना 1 जून रोजी घडली होती, मात्र त्याविषयी अलिकडेच माहिती मिळाली.  विमान हवेत असतानाच त्याचा दरवाजा हलू लागला आणि त्यातून आवाज येऊ लागले. त्यामुळे विमानातील प्रवाशांची तारांबळ उडाली होती… दरवाजा घट्ट बसवण्यासाठी विमानातील कर्मचा-यांनी त्याच्या वरील बाजूच्या फटीत टिश्यू पेपर भरल्याची माहिती आहे… या धडकी भरवणा-या प्रकारानंतरही ते विमान हाँगकाँगमध्ये सुखरूप उतरले होते.. अहमदाबाद दुर्घटनेपूर्वी हा प्रकार असल्याची माहिती.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
spot_img

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!