Homeदेश-विदेशसरकारी स्किममधून घेतलं 10 लाखांचं कर्ज, आता बनला ₹2200000000 चा ब्रॅण्ड!

सरकारी स्किममधून घेतलं 10 लाखांचं कर्ज, आता बनला ₹2200000000 चा ब्रॅण्ड!

यशोगाथा: नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय करावा असे प्रत्येकाला वाटत असते. पण त्यासाठी काय करायला हवं याची माहिती अनेकांकडे नसते. तुमचे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकदा सरकारी योजना मदत करत असतात. ज्यांना या योजनांचा चांगला फायदा करुन घेता आला त्यांना आपल्या व्यवसायाची भरभराट करता येते. अनंत तांतेड यांची कहाणीदेखील अशीच आहे. आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात.

अनंत तंटेड मूळचे इंदूरचे आहेत. ते एक उद्योजक आहेत ज्यांनी त्यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाने एक यशस्वी फॅशन ब्रँड उभारलाय. त्यांचे कुटुंब आधीच कापड व्यवसायात होतं पण अनंत यांनी स्वतःचा मार्ग स्वतः बनवण्याचा निर्णय घेतला. सुमारे 13 वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या 23 व्या वर्षी अनंत यांनी या दिशेने पाऊल टाकले. त्यांनी सरकारी योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले. यासह त्यांनी बेंगळुरूच्या कोरमंगला येथे ‘द इंडियन गॅरेज कंपनी’ (TIGC) सुरू केली. सुरुवातीला त्यांच्यासोबत फक्त 4 लोक होते. आज TIGC एक मोठा ब्रँड बनला. त्याची उलाढाल सुमारे 220 कोटी रुपयांची आहे. बेंगळुरूमध्ये त्यांचे 20 हजार चौरस फूट एरियात कार्यालय आहे. त्यांच्या टीममध्ये 400 कर्मचारी आहेत. TIGC परवडणाऱ्या किमतीत डिझायनर-गुणवत्तेचे कपडे विकते. अनंत तांतेड यांनी हे यश कसे मिळवले? जाणून घेऊया.

वडील कपडे वितरक असलेल्या अनंत यांनी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात  शर्ट विकले. यामुळे त्यांना व्यवसायाचा अनुभव मिळाला. तेव्हाच स्वतःचा कपड्यांचा ब्रँड लाँच करण्याचे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे जास्त भांडवल नव्हते. म्हणून त्यांनी सरकारी योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले. या मर्यादित भांडवलातून त्यांनी बंगळुरूतील कोरमंगला येथील एका छोट्या कार्यालयात ‘द इंडियन गॅरेज कंपनी’ (TIGC) सुरू केली. सुरुवातीला त्यांच्यासोबत फक्त 4 लोक होते.

भारतीय फॅशन मार्केटमध्ये, विशेषतः पुरुषांच्या कपड्यांमध्ये ब्रँड स्थापित करणे सोपे काम नव्हते. सुरुवातीला, TIGC ने पुरुषांच्या कॅज्युअल कपड्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यात शर्ट, टी-शर्ट आणि जीन्स सारख्या उत्पादनांचा समावेश होता. या विभागात त्यांना मोठ्या ब्रँड आणि आधीच स्थापित खेळाडूंशी स्पर्धा करावी लागली. यासाठी मार्केटिंग, गुणवत्ता आणि वितरणात सतत नावीन्य आवश्यक होते, हे अनंत यांना जाणवले होते.

अनंत तांतेड यांनी डिजिटल आणि ई-कॉमर्सची वाढती शक्ती ओळखली. त्यांनी त्यांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकण्याकडे विशेष लक्ष दिले. यामुळे त्यांना संपूर्ण भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. ही रणनीती त्यांच्यासाठी गेम-चेंजर ठरली. कारण यामुळे त्यांना पारंपारिक रिटेल स्टोअर्सच्या मोठ्या खर्चापासून वाचवले. तसेच वेगाने वाढण्याची संधी दिली. कालांतराने, TIGC ने त्यांची प्रोडक्ट रेंज वाढवली. पुरुषांसोबत महिलांच्या कपड्यांच्या विभागातही एन्ट्री केली.

गुणवत्ता, डिझाइन आणि परवडणाऱ्या किमतींमुळे ‘द इंडियन गॅरेज कंपनी’ ला वेगाने लोकप्रियता मिळाली. अनंत तांतेड यांच्या नेतृत्व क्षमतेने आणि त्यांच्या टीमच्या कठोर परिश्रमाने TIGC ला एका लहान स्टार्टअपमधून एका ओळखण्यायोग्य ब्रँडमध्ये रूपांतरित केले. आज, TIGC भारतातील आघाडीच्या ऑनलाइन फॅशन ब्रँडपैकी एक आहे. ते अनेक प्रमुख ई-कॉमर्स पोर्टलवर आहेत.

अनंत तांतेड यांनी अलीकडेच क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचा व्यवसाय 220 कोटी रुपयांचा आहे. मर्यादित संसाधने असूनही एक तरुण उद्योजक योग्य रणनीती आणि दृढनिश्चयाने कसा यशस्वी व्यवसाय उभारू शकतो? हे अनंत तांतेड यांच्या कथेतून दिसून येते. ही केवळ एका कपड्यांच्या ब्रँडची कहाणी नाही तर एका स्वप्नाला वास्तवात रूपांतरित करण्याची कहाणी म्हणता येईल. उद्योग क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी अनंत यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घ्यायला हवी.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!