Homeदेश-विदेशमहाराष्ट्रासहीत भारतातील 'या' राज्यांमध्ये जाताना...; अमेरिकेचा आपल्या नागरिकांना इशारा

महाराष्ट्रासहीत भारतातील ‘या’ राज्यांमध्ये जाताना…; अमेरिकेचा आपल्या नागरिकांना इशारा

अमेरिकेच्या प्रवासावर अमेरिकेचा गजर वाटतो: अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रविवारी एक नवीन सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये परदेशात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकांना अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या  आपल्या नागरिकांसाठी एक नवीन ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर ही अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या अ‍ॅडव्हायजरीमध्ये बलात्कार आणि हिंसक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नमूद करत, विशेषतः उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील प्रवास टाळण्याची सूचना करण्यात आली आहे.

अ‍ॅडव्हायजरीमध्ये काय सांगितलं आहे?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅडव्हायजरीत भारतातील गुन्हेगारी आणि दहशतवादी हल्ल्यांचा धोका अधोरेखित करण्यात आला आहे. यात म्हटलं आहे की, ‘भारतात बलात्कार हे वेगाने वाढणारे गुन्हे आहेत आणि पर्यटक स्थळांवरही हिंसक प्रकार वाढले आहेत. दहशतवादी हल्ले कोणत्याही क्षणी होऊ शकतात, आणि अशा वेळी बाजारपेठा, मॉल्स, ट्रान्सपोर्ट हब्स यांसारखी ठिकाणं विशेषतः लक्ष्य बनू शकतात.’ त्यामुळे सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा: इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री! इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर केला हल्ला

‘या’ राज्यांमध्ये प्रवास न करण्याचा इशारा

अ‍ॅडव्हायजरीनुसार छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील ग्रामीण भागांमध्ये नक्षलवादी हालचालींमुळे प्रवास टाळावा, असं अमेरिकेने स्पष्टपणे म्हटलं आहे. तसेच मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्षामुळे त्या भागातही प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये (लेह आणि पूर्व लडाख वगळता) देखील सावधगिरी बाळगण्याचं निर्देश दिले गेले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष परवानगी अनिवार्य

अ‍ॅडव्हायजरीत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की, भारतात कार्यरत अमेरिकी सरकारी कर्मचाऱ्यांना झारखंड, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात प्रवास करण्यासाठी आधीच परवानगी घ्यावी लागेल. मणिपूरमध्येही प्रवास करण्यासाठी आधी मंजुरी घेणं अनिवार्य आहे.

ही अ‍ॅडव्हायजरी 16 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, ग्रामीण भागांमध्ये अमेरिकन नागरिकांसाठी मदत मर्यादित असते, त्यामुळे प्रवासापूर्वी योग्य तयारी ठेवण्याचंही आवाहन केलं आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

ब्रिटनच्या ‘पहिल्या गे वडिलांवर’ बाल लैंगिक गुन्ह्यांचे आरोप:’पती’सह 18 नवीन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल

0
ब्रिटनमध्ये 'पहिले गे वडील' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक बॅरी ड्रुइट-बार्लो आणि त्यांचे 'पती' स्कॉट ड्रुइट-बार्लो यांच्यावर बाल लैंगिक गुन्हे आणि बलात्कार यासह 18...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
spot_img

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
error: Content is protected !!