पायल अरोरा: 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताची उच्च स्तरीय चौकशी सुरु आहे. यातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान भारताच्या नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालनालयाने (DGCA) टाटा ग्रुप एअरलाइन्सच्या 3 अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. या 3 अधिकाऱ्यांपैकी पायल अरोरा या एका अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आहे. सुरक्षा त्रुटी प्रकरणात DGCA ने या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. DGCA च्या या आदेशानंतर, अहमदाबाद विमान अपघातासाठी पायल अरोरा आणि इतर दोन अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातासाठी जबाबदार धरण्यात येणारी ही पायल अरोरा कोण आहे? याबद्दल जाणून घेऊया.
ARMS कडून झालेली आढळली चूक
परवाना, विश्रांती आणि नवीन आवश्यकतांमध्ये चूक असूनही एअर इंडियाने उड्डाण क्रू सदस्यांच्या वेळापत्रक आणि ऑपरेशन्सबाबत वारंवार गंभीर चूक स्वेच्छेने उघड केल्याचे DGCA ने त्यांच्या आदेशात म्हटले आहे. ARMS वरून CAE फ्लाइट अँड क्रू मॅनेजमेंट सिस्टममध्ये बदल झाल्यानंतर पुनरावलोकनादरम्यान हे उल्लंघन आढळून आल्याचेही त्या पुढे म्हटलंय. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलंय.
ARMS म्हणजे नक्की काय?
ARMS म्हणजे एअर रूट मॅनेजमेंट सिस्टम. हे एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. जे एअरलाइनद्वारे विविध ऑपरेशनल आणि मॅनेजमेंट फंक्शन्ससाठी वापरले जाते. ज्यामध्ये क्रू मेंबर्सची यादी आणि फ्लाइट प्लॅन इत्यादींचा समावेश असतो.
अपघातासाठी कोणते अधिकारी जबाबदार आहेत?
डीजीसीएने आपल्या आदेशात अहमदाबाद विमान अपघातासाठी एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये विभागीय उपाध्यक्ष चुरा सिंग, ऑपरेशन डायरेक्टरेटच्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंग अँड प्लॅनिंग प्रमुख पायल अरोरा यांचा समावेश आहे.
या अपघातासाठी पायल अरोरा जबाबदार का?
एअर इंडियाने दिलेली माहिती स्वेच्छेने दिली असली तरी क्रू मेंबरची कर्तव्ये निश्चित करण्याच्या प्रक्रियेत, नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आहेत. डीजीसीएने आपल्या आदेशात याबद्दल माहिती दिली. डीजीसीएच्या मते, ‘या अधिकाऱ्यांनी वारंवार चुकीचे क्रू पेअरिंग, आवश्यक परवाने आणि प्रशिक्षण नियमांकडे दुर्लक्ष केले.वेळापत्रक आणि तपासणीमध्ये निष्काळजीपणा करणे यासारखे गंभीर उल्लंघन केले आहे’.
या सर्व गंभीर आणि वारंवार पुनरावृत्ती होणाऱ्या चुका मानल्या गेल्या आहेत. पायल अरोरा यांच्याकडे क्रू शेड्युलिंग आणि प्लॅनिंगची जबाबदारी होती. क्रू मेंबरची ड्युटी ठरवण्याची आणि ती शेड्यूल करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. या आधारावर डीजीसीएने तिच्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले असल्याचे डीजीसीएच्या आदेशात म्हटलंय.




























