Homeदेश-विदेशElection Commission: मोठी बातमी! निवडणुकीचे फोटो, व्हिडीओ 45 दिवसात नष्ट करा; निवडणूक...

Election Commission: मोठी बातमी! निवडणुकीचे फोटो, व्हिडीओ 45 दिवसात नष्ट करा; निवडणूक आयोगाचं नवं फर्मान

निवडणुकीचे फुटेज आता 45 दिवसांत नष्ट केलं जाणार आहे. मतदान प्रकियेशी संबंधित व्हिडीओ, बूथवरील सीसीटीव्ही फुटेज, संग्रहित फोटो निवडणुकीनंतर 45 दिवसांत नष्ट करा, असे आदेश राज्यांच्या निवडणूक अधिका-यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेत. मात्र या सूचनेमुळे विरोधकांनी निवडणुक आयोगावर टीकेची झोड उठवलीये. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का, लोकसभेनंतर अचानक वाढलेली मतदार संख्या संशयाच्या भोव-यात आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने जारी केलेला नवा आदेश वादात सापाडलाय. निवडणुकीनंतर 45 दिवसांत मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्व व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज, फोटो डिलीट करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्यात. मात्र जर या कालावधीत म्हणजेच 45 दिवसांमध्ये निवडणूक निकालाला आव्हान देणारी कोणतीही याचिका न्यायालयात दाखल झाली तर ते व्हिडिओ नष्ट करता येणार नसल्याचंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. याआधी निवडणुकीच्या वेगवेगळ्या टप्प्याचं रेकॉर्डिंग 3 महिने ते 1 वर्षांपर्यंत जतन करण्याच्या सूचना होत्या. मात्र आता निवडणूक आयोगाने हा निर्णय बदललाय.

काय आहे नवा आदेश?

– निवडणुकीशी संबंधित सर्व व्हिडिओ आणि फोटोज केवळ 45 दिवसांसाठीच जतन केले जाणार

– यामध्ये अर्ज दाखल करणे, प्रचाराचा कालावधी, मतदार केंद्राच्या आत आणि बाहेर, मतमोजणीचा समावेश

– 45 दिवसांच्या आत निकालाला न्यायालयात आव्हान दिलं गेलं तर….

– याचिका निकाली निघेपर्यंत सर्व व्हिडिओ, फोटो जतन केले जातील

सोशल मीडियावर कोणताही संदर्भ न देता चुकीच्या पद्धतीने फुटेज प्रसारित केल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. त्यामुळेट निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. मात्र या नियम बदलांवरून महाराष्ट्रातील विरोधकांनी शंका उपस्थित केलीये. काँग्रेसचे नाना पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी आयोगावर निशाणा साधलाय. तर आमदार रोहित पवारांनीही या निर्णयावरून आयोगाला काही प्रश्न विचारलेत.

https://www.youtube.com/watch?v=siudy3sgpdi

रोहित पवार काय प्रश्न विचारले?

-निवडणूक आयोगाला पारदर्शकतेचा तिटकारा आहे का?
-फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का?
-फुटेज ऑनलाईन माध्यमातून सार्वजनिक का केलं जात नाही?
-निवडणूक आयोगाला कशाची भीती वाटते?

तर ज्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य वाटतोय त्यांनी  न्यायालयात जावं अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिलीये. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी निवडणुकीदरम्याने सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली  होती. ते फुटेजही अद्याप विरोधकांना देण्यात आलेलं नाही. त्यातच आता निवडणूक आयोगाच्या या नव्या आदेशामुळे विरोधक आणखी आक्रमक झालेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

ब्रिटनच्या ‘पहिल्या गे वडिलांवर’ बाल लैंगिक गुन्ह्यांचे आरोप:’पती’सह 18 नवीन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल

0
ब्रिटनमध्ये 'पहिले गे वडील' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक बॅरी ड्रुइट-बार्लो आणि त्यांचे 'पती' स्कॉट ड्रुइट-बार्लो यांच्यावर बाल लैंगिक गुन्हे आणि बलात्कार यासह 18...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
spot_img

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
error: Content is protected !!