Homeदेश-विदेशइराणने इस्रायलच्या लष्करी हल्ले मोहम्मद जावद होसेनी यांनी इराणी दूतावासातील मिशनचे उपप्रमुख...

इराणने इस्रायलच्या लष्करी हल्ले मोहम्मद जावद होसेनी यांनी इराणी दूतावासातील मिशनचे उपप्रमुख | इराण

देश-विदेश : इराण-इस्त्राईल वॉर इंडिया स्टँडः इस्रायल आणि इराण युद्ध शिगेला पोहोचलेलं असतानाच आता इराणला भारताकडून मदतीची अपेक्षा असल्याचं समोर येत आहे. ‘ग्लोबल साऊथचा आवाज’ अशी भारताची जागतिक स्तरावर ओळख असल्याचा उल्लेख इराणने केला आहे. शांतता हवी असलेल्या देशांचा आवाज म्हणून भारताकडे पाहिलं जातं म्हणूनच बारताने इस्रायलवर दबाव आणला पाहिजे, असे मत भारतातील इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद होसेनी यांनी शुक्रवारी व्यक्त केलं. इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारताने इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे. एकीकडे भारत आणि इस्रायल हे फार पूर्वीपासूनची मित्रराष्ट्र असतानाच आता इराणनेही भारताकडे या प्रकरणात मध्यस्थितीची मागणी केल्याचं दिसत आहे.

सर्वात आधी भारताने ‘हे’ केलं पाहिजे

“आम्हाला वाटते की हे (इस्रायलकडून होणारे) हल्ले लवकरात लवकर थांबवले गेले पाहिजेत. हे सारं संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रयत्नांद्वारे शक्य आहे”, असे होसेनी यांनी म्हटल्याचे ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. “ग्लोबल साऊथचा आवाज असलेले भारतासारखे देश शांततेचे समर्थक आहेत. त्यांनी समन्वय साधून इस्रायलवर दबाव आणला पाहिजे. पहिले पाऊल म्हणून त्यांनी या कृतीचा (इस्रायलच्या हल्ल्याचा) निषेध केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे पुन्हा घडणार नाही”, असे इराणचे उपराजदूत भारताकडून मदत अपेक्षित असल्याचं अधोरेखित करताना म्हणाले. आता या विनंतीवर भारत काही प्रतिक्रिया देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इस्रायलचं एकमेव ध्येय म्हणजे…

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायली सरकार कोणतेही आंतरराष्ट्रीय नियम न पाळता, विरोधकांवर हल्ले करून प्रादेशिक वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही होसेनी यांनी केला आहे. “इस्रायली सरकार आणि अधिकारी कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. त्यांचे एकमेव ध्येय प्रादेशिक वर्चस्व मिळवणे आहे. त्या ध्येयासाठी ते त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे बलिदान देण्यास, त्यांना ठार मारण्यासही तयार आहेत,” असे इराणचे उपराजदूत म्हणाले.

हे हास्यास्पद

“ते (इस्रायल) लोकांना मारतात आणि तरीही स्वतः पीडित असल्याचे म्हणतात. हे हास्यास्पद आहे. इराण शांततेच्या बाजूने आहे आणि जगातील प्रत्येक युद्धाला आमचा विरोध आहे,” असंही इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद होसेनी यांनी देशाची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी नेतन्याहू यांनी त्यांची भूमिका मोदींसमोर मांडली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या जी-7 देशांच्या परिषदेतही इस्रायल-इराण विषयावर चर्चा झाल्याचे समजते. यामध्येही पंतप्रधान मोदी सहभागी झालेले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

ब्रिटनच्या ‘पहिल्या गे वडिलांवर’ बाल लैंगिक गुन्ह्यांचे आरोप:’पती’सह 18 नवीन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल

0
ब्रिटनमध्ये 'पहिले गे वडील' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक बॅरी ड्रुइट-बार्लो आणि त्यांचे 'पती' स्कॉट ड्रुइट-बार्लो यांच्यावर बाल लैंगिक गुन्हे आणि बलात्कार यासह 18...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
spot_img

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
error: Content is protected !!