Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी जाहीर युतीचे संकेत, मनसे का घेतेय सावध भूमिका?

उद्धव ठाकरेंनी जाहीर युतीचे संकेत, मनसे का घेतेय सावध भूमिका?

महाराष्ट्र  : शिवसेना एमएनएस अलायन्स: उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्याचा दुस-यांदा प्रस्ताव दिल्यानंतरही मनसेनं सावध पवित्रा घेतलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती करण्यासाठी एवढी आतूर का झालीये असा सवाल मनसेनं विचारलाय. आत्ता 20 आमदार आहेत, 60 आमदार असते तर ते युतीसाठी तेवढेच आतुर असते का? असा सवालही त्यांनी विचारलाय.

उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्यासंदर्भात सलग दुस-यांदा जाहीर वक्तव्य केलंय. युतीसाठी उद्धव ठाकरे स्वतः किती उत्सुक आहेत याचे एकप्रकारे संकेतच त्यांनी दिले. उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उत्साह पाहून मनसैनिकांना आणि मनसेला आनंद होईल असा अंदाज होता. पण मनसेला शिवसेनेच्या या आनंदामागं थोडासा संशय वाटू लागलाय. युतीसाठी उद्धव ठाकरेंचा उत्साह गेल्या 19 वर्षांत का दिसला नाही? असा प्रश्न  मनसेनं विचारलाय.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आताच मनसे का आवडू लागली असा सवाल मनसेनं विचारलाय. मनसैनिकांनी बाळासाहेबांचा फोटो वापरु नये असं संजय राऊत सहा महिन्यापूर्वी सांगत होते असा आरोपही मनसेनं केलाय. फक्त 20 आमदार निवडून आल्यानं ठाकरेंच्या पक्षाला मनसे जवळची वाटू लागली आहे का असा सवालही त्यांनी विचारलाय.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा झालेली नसताना ठाकरेंचे शिवसैनिक राज्यभर बॅनरबाजी करायला लागलेत. ही बॅनरबाजी करुन युतीसाठी मनसेवर आणि राज ठाकरेंवर दबाव आणला जातोय का असं मनसे विचारु लागलीये.

युतीसाठी शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंचा जेवढा उत्साह आहे तेवढा उत्साह ना मनसैनिकांत आहे ना राज ठाकरेंमध्ये. राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरेंचं हे बंधूप्रमे शांतपणे पाहतायेत. उद्धव ठाकरेंनी जाहीर युतीचे संकेत दिल्यानंतर मनसेची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया मात्र शिवसैनिकांना विचार करायला लावणारी आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!