Homeमनोरंजनलंडनमध्ये बॉयफ्रेंडसोबत जान्हवी कपूरचा रोमँटिक ब्रेक; एकाच प्लेटमधून खाण्याचा व्हिडीओ व्हायरल, नेमका...

लंडनमध्ये बॉयफ्रेंडसोबत जान्हवी कपूरचा रोमँटिक ब्रेक; एकाच प्लेटमधून खाण्याचा व्हिडीओ व्हायरल, नेमका आहे तरी कोण?

मनोरंजन (चित्र नगरी ): बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बऱ्याच चर्चेत आहे. तिचा कान्स फेस्टिव्हलमदील लूक चाहत्यांना फारच आवडला. तिच्या आगमी चित्रपटांची देखील चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातचं सध्या जान्हवी लंडनमध्ये तिचा बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवत आहे. तिच्या या युरोपियन ट्रिपमध्ये तिची बहीण आणि अभिनेत्री खुशी कपूर देखील सहभागी झाली आहे. सोशल मीडियावर जान्हवीने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती बॉयफ्रेंडसोबत गोड क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. एक व्हिडीओ विशेष लक्ष वेधून घेतो, ज्यामध्ये जान्हवी त्याच्या प्लेटमधून खाताना दिसते आणि त्यावर त्याची रिअॅक्शन चाहत्यांना फारच मजेशीर वाटली आहे. दोघांचा हा क्षण इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. पाहूयात कोण आहे जान्हवीचा बॉयफ्रेंड.

‘कॉफी विथ करण’मध्ये खुलासा
जान्हवी आणि शिखरच्या नात्याची अधिकृत चर्चा सर्वप्रथम करण जोहरच्या प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’ च्या 8व्या सीझनमध्ये झाली होती. करणने जान्हवीला त्यांच्या सततच्या भेटी आणि ब्रेकअपबद्दल विचारले असता, जान्हवीने उत्तर दिलं, ‘तू ते गाणं ऐकलंय का ‘नादान परिंदे घर आजा’? शिखर मला ते गाणं नेहमी म्हणायचा.’ या आधीही जान्हवीला शिखरच्या नावाचा नेकलेस घालून पाहिलं गेलं आहे. दोघं अनेकदा पार्टी, इव्हेंट्स आणि ट्रिप्समध्ये एकत्र दिसले आहेत, ज्यामुळे त्यांचं नातं पुन्हा चर्चेत आलं आहे.

शिखर पहारिया कोण आहे?
शिखर पहारिया हा भारताचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याची आई स्मृती शिंदे एक अभिनेत्री होत्या. शिखरचा भाऊ वीर पहारियाने नुकताच बॉलिवूडमध्ये ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, शिखर जान्हवीसोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील उपस्थित होता. तिथे जान्हवीने तिच्या आगामी ‘होमबाउंड’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सहभाग घेतला. हा चित्रपट नीरज घायवान दिग्दर्शित असून, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा प्रमुख भूमिका साकारत आहेत.

हे ही वाचा: करिश्मा- अभिषेकचं नातं संपण्यामागचं खरं कारण समोर; अमिताभ बच्चन म्हणाले, ‘वेगळं होणं कधी कधी योग्यच असतं’

जान्हवी कपूरच्या आधीच्या अफेअर्सची चर्चा

शिखरच्या आधी जान्हवीचं नाव तिच्या जवळच्या मित्रांसोबत जोडलं गेलं होतं. सर्वप्रथम तिचं नाव अक्षत राजनसोबत चर्चेत आलं होतं. त्यानंतर ईशान खट्टरसोबत तिचं नाव जोडण्यात आलं, जेव्हा दोघांनी ‘धडक’ चित्रपटात काम केलं. काही काळानंतर कार्तिक आर्यनसोबत देखील जान्हवीचं नाव जोडलं गेलं. मात्र सध्या ती तिच्या शाळेतील मित्र शिखर पहारियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘परम सुंदरी’, वरुण धवनसोबत ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ आणि राम चरणसोबत ‘पेड्डी’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!