Homeमहाराष्ट्रमनसे राज ठाकरे केंद्रीय समितीला जे काम करत नाहीत त्यांना काढून टाकण्याचे...

मनसे राज ठाकरे केंद्रीय समितीला जे काम करत नाहीत त्यांना काढून टाकण्याचे आदेश देतात

महाराष्ट्र (मुंबई) : मुंबई महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करतील की नाही यासंदर्भात वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. दोन्ही नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असली तरी त्यावर अधिकृत भाष्य केलं नाही. मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असून, राज ठाकरेंसोबत युती केल्यास जागावाटप कसं करावं याचा तिढा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आता राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. काम न करणाऱ्यांना थेट पक्षातून काढून टाकण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

मनसेकडून मुंबईत संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत. काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना तसंच शाखाध्यक्षांना नारळ देण्यात येण्याची शक्यता आहे. 24 जूनला याबाबतीत सविस्तर अहवाल राज ठाकरेंना देण्यात येणार  आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल आणि नवीन नेमणूका जाहीर होतील.

मुंबई महापालिकेच्या दृष्टीने राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. काम न करणाऱ्यांना काढून टाका व तात्काळ पर्यायासह 24 जूनला अहवाल सादर करा असा आदेश त्यांनी केंद्रीय समित्यांना दिला आहे. मनसेत अनेक विभागात पर्याय शोधणे सुरू आहे.

शिवसेना भवनातही बैठक, उद्धव ठाकरेंच्या सूचना

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे नेते, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख यांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधवही उपस्थित आहेत. आदित्य ठाकरेही बैठकीला पोहोचले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री आमदार, खासदारांची बैठक आणि स्नेहभोजन वांद्रेतील ताज लँड्स एंड हॉटेलला होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांना सूचना केल्या जात आहेत. सचिव अनिल देसाई पक्षाच्या सूचना पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!