Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उधव ठाकरे राज ठाकरे युती

महाराष्ट्र राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उधव ठाकरे राज ठाकरे युती


उधव ठाकरे राज ठाकरे अलायन्स शिवसेना फाउंडेशन डे: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे.  शिवसेना मनसे युती होणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या रंगली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबात सकारात्मक चर्चा देखील सुरु आहेत.अशातच शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजीत मेळाव्यता बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी मनसे शिवसेना युतीबाबत एक सूचक वक्तव्य केले. काय होणार की नाही ते कळेल… जे राज्याच्या मनात आहे ते मी करेन असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीबाबत सकारात्मक विधान केले आहे.  महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होऊ नये यासाठी  मालकाचे नोकर गाठीभेटी घेतायत. मुंबईचा ताबा आम्ही घेणारच आहोत असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे अजूनही सकारात्मक आहे. जनतेच्या मनात आहे तेच करणार असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात एक मोठं विधान केलंय. मराठी माणसांची शक्ती एकत्र येत असल्यामुळे त्यांच्याकडून भेटीगाठी सुरू आहेत. तसंच ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसंदर्भात सकारात्मक वक्तव्य येताहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असी अटकळ बांधली जात आहे. नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय.. मनसेसोबत युती करायची की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या बैठकीत माजी नगरसेवकांना विचारला. यावेळी युती केली तर फायदा होईल, कारण मुंबईत युतीसंदर्भात अनुकूल वातावरण आहे अशी माहिती माजी नगरसेवकांनी ठाकरेंना दिली.

युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांतील नेतेही सकारात्मक असल्याचा पाहायला मिळतंय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेत्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रीया दिली.

दरम्यान, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरे गटाची युती भाजपचे वरिष्ठ नेते होऊ देणार नाहीत असं ठाकरे गटाच्या काही नेत्यांना वाटतं असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. 100 टक्के महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती आहे.  विशेषतः यांत भाजप आक्रमक दिसून येत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- 13 वर्षांच्या मुलींना वाचवा:याच वयात मासिक पाळी सुरू होते, खरे प्रेम...

0
यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी सांगितले- मी काही बोलले की ते व्हायरल होते. माझ्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नसतो. तुम्हाला सर्वोत्तम बनवणे हे...

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!