Homeमहाराष्ट्रत्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; घरोघरी शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत

त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; घरोघरी शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्र : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळं सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. तासाभराच्या पावसामुळे रस्त्यांच्या अक्षरक्षः नदी झालीये. यावेळी शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे स्थानिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

पिंपळगाव गरुडेश्वर त्र्यंबकेश्वर रस्ता परिसरात मंगळवारी ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. या संततधार पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. काही भागांत तर शेतजमिनीची मातीही पाण्यासोबत वाहून गेल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाचे पाणी शेतात आणि रस्त्यांवर साचल्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी वाहतूक व नागरिकांच्या हालचाली पूर्णपणे विस्कळीत झाल्या. प्रशासनाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा फटका बसलाय.. कुडाळ तालुक्यातील नारूर गावात हातेरी नदीच्या पुरात रस्ता वाहून गेलाय. यामुळे 50 ते 60 गावांचा संपर्क तुटलाय.. रस्ता वाहून गेल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींनी तातडीनं हा रस्ता मंजूर करावा अशी मागणी गावक-यांनी केलीये.

यंदा अंदाजित वेळेनुसारच मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असून, पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिलीये.  सोलापूरमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मका, डाळिंब आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात 32 हजार 440 शेतक-यांच्या 21 हजार 989 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झालेय. त्यामुळे शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 64 कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ साडे 3 टक्के खरीप पेरणी पूर्ण झालीय.  अनेक भागात पेरणीनंतर पाऊस पडला नसल्यामुळे कापूस,सोयाबीन तसेच मका या पीकांवर परिणाम झालाय. पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिलीय. त्यामुळे जमिनीत वाफसा तयार होण्यास मदत होतेय. आता शेतक-यांनी खरीपाच्या पेरणीला सुरूवात केलीय. शेतीशिवारात पेरणीची लगबग पाहायला  मिळतेय. शेतक-यांची सर्वाधिक पसंती सोयाबीनच्या पेरणीला आहे.

मुंबईत 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणा-या जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणा-या इतर तलावांतही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पुढच्या 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये आणि पुणे आणि नाशिकच्या घाट भागात पुढील 3-4 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!