Homeमनोरंजनमोहम्मद शमी रवी शुष्रीवर रागावले

मोहम्मद शमी रवी शुष्रीवर रागावले

मनोरंजन (क्रीडा) :  मोहम्मद शमी आणि रवी शास्त्री: भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारत अरुण यांनी मोहम्मद शमीबाबत एक किस्सा उघड केला आहे, ज्यामध्ये रागाच्या भरात त्याने आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि जोहान्सबर्गमध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरोधात विजय मिळवून दिला. 2018 मधील या सामन्यात मोहम्मद शमीने 5 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमीच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने चार दिवसांत सामना संपवला आणि 63 धावांनी विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना होता. दक्षिण आफ्रिकेने आधीचे दोन्ही सामने जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. जोहान्सबर्गमधील तिसरा सामनाही जिंकत दक्षिण आफ्रिका संघ भारताला व्हाइटवॉश देत इतिहास रचण्याच्या तयारीत होता. या सामन्यात त्यांना विजयासाठी 223 धावांची गरज होती.

दुपारच्या लंचपर्यंत दक्षिण आफ्रिकेची अवस्थात 171 धावांवर 7 गडी बाद होती. सोनी स्पोर्टशी संवाद साधताना, रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमीला मी प्लेट भरुन बिर्याणी खाताना पाहून काय घडलं होतं याचा खुलासा केला.

“जोहान्सबर्ग मैदान आणि शेवटचा दिवस होता. या सामन्यात वातावरण चांगलंच तापलेलं होतं. त्यांना सामना जिंकण्यासाठी 240 धावांची गरज होती. शेवटच्या दिवशी त्यांना 100 धावा हव्या होत्या आणि आठ विकेट्स हातात होत्या. लंच टाईममध्ये मी शमीची प्लेट पाहिली तर त्यात बिर्याणीचा डोंगरच होता,” असं रवी शास्त्री यांनी सांगितलं.

भारतीय संघाचे माजी गोलंदाज प्रशिक्षक अरुण यांनी खुलासा केला की, रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमीला इतक्या बिर्याणीने तुझी भूक मिटली का? असा प्रश्न विचारला. “रवी त्याच्यासमोर चालत गेला आणि विचारलं, तुझी भूक मिटली का?”.

यानंतर चिडलेल्या मोहम्मद शमीने आपली बिर्याणीची प्लेट परत केली  आणि म्हणाला मला आता खायचं नाही. अरुण यांनी पुढे सांगितलं की, रवीने मला जर शमी रागावला असेल तर त्याला एकट्याला सोडून दे, तुला त्याच्याशी बोलायचं असेल तर सांग की विकेट घे म्हणून असा सल्ला दिला. “ही घ्या तुमची प्लेट. नको तुमची बिर्याणी, खड्ड्यात गेली तुमची बिर्याणी,” असं मोहम्मद शमी म्हणाल्याचं रवी शास्त्रींनी सांगितलं.

अरुण यांनी सांगितलं की, “रवी माझ्याकडे आला आणि म्हणाला, तो (शमी) रागावला आहे, त्याला असंच सोडून द्या. जर त्याच्याशी काही बोलायचं असेल तर विकेट घेऊन दाखव म्हणावं. रागावणं वेगळी गोष्ट आहे, पण त्याचा गोलंदाजीत वापर करणं वेगळी बाब आहे”.

‘माझ्यावर नेहमी रागावत जा…’

अखेरच्या डावात मोहम्मद शमीने 5 विकेट घेतले. दक्षिण आफ्रिकेचे 7 फलंदाज 22 धावांवर बाद झाले. अखेर सामन्यानंतर अरुण यांनी मोहम्मद शमीला बिर्याणीची प्लेट दिली असता तो  हसला आणि तुम्ही माझ्यावर नेहमी रागावत जा असं म्हणाला.

“खेळ संपल्यानंतर तो आला आणि अरुण यांनी जाऊ म्हटलं, बिर्याणी घे, आता हवी तेवढी खा. त्यावर तो म्हणाला, तुम्ही रागावात जा, मग सगळं काही ठीक होतं,” असं रवी शास्त्रींनी सांगितलं.

तो विजय भारताचा वँडरर्स स्टेडियमवरील दुसरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवरील एकूण तिसरा होता.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!