मनोरंजन (क्रीडा) : 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ (७८७-८ बोईंग ड्रीमलायनर) उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. विमान बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले, ज्यामध्ये विमानात बसलेल्या 241 जणांसह एकूण 275 जणांचा मृत्यू झाला. इंग्लंडला जाणारा एक तरुण क्रिकेटपटू देखील यात मृत्युमुखी पडला आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 23 वर्षीय दिर्ध पटेलचा समावेश आहे. जो इंग्लंडमधील लीड्स मॉडर्नियन्स क्रिकेट क्लबकडून खेळला होता. त्याने हडर्सफील्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. लीड्सच्या या क्लबने दिर्ध पटेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
क्लबने म्हटले आहे की, त्याच्या निधनाच्या बातमीने टीमला खूप दुःख झाले आहे. “क्लबमधील सर्वांच्या संवेदना दिर्धच्या कुटुंबासोबत आणि त्यांना ओळखणाऱ्या सर्वांसोबत आहेत.” बीबीसीने एअरडेल आणि व्हार्फेडेल सीनियर क्रिकेट लीगच्या प्रवक्त्याचा हवाला देत म्हटले आहे की, “दिर्ध त्याच्या नवीन नोकरीत स्थिरावल्यानंतर क्रिकेट खेळत राहू इच्छित होता.”
सामन्यापूर्वी खेळाडूंनी वाहिली आदरांजली
त्यांनी सांगितले की त्यांचा भाऊ कृतिक पूर्वी पूल क्रिकेट क्लबकडून खेळायचा. दोन्ही क्लबने आठवड्याच्या शेवटी झालेल्या सामन्यांपूर्वी एक मिनिट शांतता पाळली आणि दीर्ध पटेल यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी मुख्यमंत्री यांचेही निधन
अहमदाबाद विमान अपघाताचे अनेक त्रासदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इमारतीवर आदळताच विमान कसे आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात होते, जे त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी इंग्लंडला जात होते. त्यांचेही निधन झाले. सोमवार, १६ जून रोजी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.





























