Homeमनोरंजनक्यूआर कोडद्वारे अ‍ॅप आधारित सत्यापन सुरू करण्याची आणखी आधार फोटोकॉपीजची योजना नाही...

क्यूआर कोडद्वारे अ‍ॅप आधारित सत्यापन सुरू करण्याची आणखी आधार फोटोकॉपीजची योजना नाही तपशील जाणून घ्या


आधार उइडाई नवीन अद्यतने: कोणतंही सरकारी काम असो किंवा खासगी काम असो हल्ली भारतामध्ये कागदपत्रं म्हटल्यानंतर आधार कार्ड अनेकजागी अनिवार्य करण्यात आलं आहे. यामुळेच आता अनेकजण पाकिटात किंवा मोबाईलमध्ये डिजीटल फॉरमॅटमध्ये आधारकार्ड सोबत ठेवताना दिसतात. अनेक ठिकाणी आधारकार्डची फोटो कॉपीही मागतात. मात्र आता लवकरच आधारकार्डसंदर्भात नवी सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आधारकार्डची फोटोकॉपी (झेरॉक्स) देण्याची गरज पडणार नाही. आता डिजीटल आधारकार्ड केवळ मोबाईलमध्ये ठेवण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष पुरावा म्हणून सादर करता येणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रीक आधारकार्डही आता शेअर करता येणार आहे. नवीन क्यूआर कोड पद्धतीवर आधारीत ही सेवा अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून वापरता येणार आहे. ही सुविधा आहे तरी कशी आणि त्याचा लाभ कसा घेता येईल हे पाहूयात…

थेट माहिती होणार अपडेट; पण कशी?

या नव्या अ‍ॅप्लिकेशनमुळे लोकांची आधारकार्डसंदर्भातील अनेक कामे सोपी होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत आधारकार्डधारांना बायोमेट्रिक तपशील सादर करण्याची सुविधा वगळता पत्ता बदल किंवा मोबाईल क्रमांक बदलासाठी आधार केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच युआयडीएआयने आधारसंदर्भातील एक नवीन प्रोटोकॉल तयार केला आहे. यामुळे आधारकार्डधारकाचा पत्ता आणि इतर तपशील जन्माचा दाखला, मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन, पीडीएस आणि मनरेगा डेटाबेसमधून आपोआप घेईल. यामुळे लोकांचे काम सोपे होणार आहे. याशिवाय या नव्या यंत्रणेमुळे आधार बनवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात रोखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एवढेच नाहीतर तर युआयडीएआय अगदी वीज बिल डेटाबेसच्या माध्यमातूनही थेट पत्ता आणि इतर तपशील घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे झालं तर आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्याचं काम आणखी सोयीस्कर होईल.

आधारवरील हा डेटा घरच्या घरी बदलता येणार

युआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सी एक नवीन अ‍ॅप विकसित करत आहे. एक लाख मशीनपैकी सुमारे 2 हजार मशीन आता नवीन टूलमध्ये हलवण्यात आल्यात. लवकरच लोकांना घरी बसून फिंगरप्रिंट आणि आयरिस म्हणजेच डोळ्यांच्या बुबुळांचे छाप देण्याव्यतिरिक्त आधार कार्डसंदर्भातील सर्व काम अ‍ॅप्लिकेशनवरु करता येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे असं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. आधारकार्डवरील घरचा पत्ता, फोन नंबर अपडेट करणे, नाव बदलणे आणि चुकीची जन्मतारीख दुरुस्त करणे या गोष्टीही आता घरच्या घरी करता येणार आहेत.

याचा असाही फायदा

आधारचा गैरवापर रोखण्यासाठी आधारच्या क्यूआर कोडवर आधारित मोबाईल-टू-मोबाइल किंवा अ‍ॅप-टू-अ‍ॅप ट्रान्सफरची सुविधा आवश्यक मानली जात आहे. हॉटेलमध्ये चेक-इन करण्यापासून ते धावत्या ट्रेनमध्ये तिकीटासोबत सादर करायचं ओळखपत्र म्हणून आणि सरकारी कार्यालयांपासून खासगी कार्यालयांमध्ये सगळीकडेच याचा वापर केला जाणार आहे. यामुळे आधारकार्डधारकाला स्वतःच्या डेटावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवता येणार आहे. ही माहिती आधारकार्डधारकाची संमती असेल तरच समोरच्या व्यक्तीसोबत शेअर केली जाईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

चीनमध्ये भ्रष्टाचारावर मोठी कारवाई:माजी पोलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई पक्षातून निष्कासित

0
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत, पोलिट ब्युरोचे माजी सदस्य मा शिंगरुई यांना कम्युनिस्ट पक्षातून निष्कासित करण्यात...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

दिव्यांगांवर टिप्पणी- कॉमेडियन समय रैनावर 3 लाख दंड:सुप्रीम कोर्टाने म्हटले- आम्ही स्वातंत्र्य दिले जेणेकरून...

0
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना, रणवीर अलाहाबादिया, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तंवर यांच्यावर...
spot_img

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...
error: Content is protected !!