अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बेपत्ता दिग्दर्शक: गुजरातचा चित्रपट दिग्दर्शक महेश कलावाडियाला लोकं महेश जीरावाल नावानं देखील ओळखतात. तर 12 जुन रोजी अहमदाबाद एअर-इंडिया विमान क्रॅशनंतर तो कथितपणे गायब झाला आहे. त्याची पत्नी हेलतनं यानंतर एक दावा केला आहे की या विमान दुर्घटने दरम्यान, रस्त्यावर असणाऱ्या ज्या लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे त्यांच्यात तिचा नवरा अर्थात महेश देखील असू शकतो. नवऱ्याची ओळख करून घेण्यासाठी तिनं DNA सॅम्पल देखील दिला.
खरंतर, 12 जून रोजी एअर इंडियाचं विमान अहमदाबादवरून लंडन जात होतं. ज्यात 242 प्रवासी प्रवास करत होते. पण टेक-ऑफ केल्यानंतर काही सेकंदातच हे प्लेन क्रॅश झालं आहे आणि मेघानीनगरमध्ये एक मेडिकल कॉलेजच्या होस्टेलमध्ये क्रॅश झालं. त्यामुळे तिथे देखील खूप गंभीर नुकसान झालं आहे आणि या प्लेन क्रॅशमध्ये 29 लोकांनी त्यांचा जीव गमावला. आता पोलिस या हत्येत ज्यांनी जीव गमावला आहे त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. फिल्ममेकर महेशच्या पत्नीनं सांगितलं की तिला आता भीती वाटते की ते या 29 लोकांपैकी असू शकतात, जे त्यावेळी जमिनीवर होते आणि त्यांचं निधन झालं.
PTI या न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ‘माझ्या नवऱ्यानं दुपारी 1.14 वाजता फोन करून सांगितलं की त्यांची मीटिंग संपली आणि तो घरी येतोय. पण तो जेव्हा परतला नाही तेव्हा मी त्याच्या फोनवर फोन केला, पण त्याचा फोन हा स्विच ऑफ असल्याचं कळलं. पोलिसांनी सांगितलं की त्याच्या फोनची, पण त्याचा फोन हा स्विच ऑफ होता. पोलिसांनी सांगितलं की त्याच्या फोनची सगळ्यात शेवटची लोकेशन ही क्रॅश झाला त्याच्या 700 मीटर लांब होती.’
हेही वाचा : आमिर खानवर करण्यात आला लव्ह जिहादचा आरोप; मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणाला, ‘जेव्हा दोन धर्माचे लोक…’
हेतलनं सांगितलं की ‘त्याचा फोन जवळपास 1:40 ला बंद झाला. त्याची स्कूटर आणि मोबाईन फोन दोन्ही गायब आहे. हे काही असचं होत नाही, तो कधीच त्या रस्त्यावरून घरी यायचा नाही. आम्ही माहिती करण्यासाठी DNA सॅम्पल दिले जेणेकरून कळेल की तो तिथे खाली असणाऱ्या लोकांमध्ये तर नव्हता.’
दरम्यान, जास्त लोकांचं पार्थीव हे जळाल्यामुळे त्यांची ओळख होत नाही आहेत. त्यामुळे अधिकारी या भयानक घटनेत ज्या लोकांचा जीव गेला आहे त्यांची ओळख करण्यासाठी DNA टेस्ट करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की अहमदाबाद विमान दुर्घटनेत ज्यांनी जीव गमावला त्यांच्यातील 47 लोकांची DNA टेस्ट केल्यानंतर ओळख मिळाली आहे आणि आतापर्यंत 24 पार्थीवं हे त्यांच्या कुटुंबाला स्वाधिन करण्यात आले आहेत.
महेश जीरावालाला जाहिराती आणि म्यूजिक व्हिडीओचा दिग्दर्शक म्हणून ओळखायचे. तो प्रोडक्शन हाउस महेश जीरावालाच्या प्रोडक्शन्सचे CEO होते. त्याच्याकडे म्यूजिक व्हिडीओ आहेत, जे गुजराती भाषेत आहेत आणि नेहमीच तो इन्स्टाग्रामवर त्याच्या कामाविषयी अपडेट पोस्ट करायचा. इतकंच नाही तर त्यानं 2019 चा चित्रपट ‘कॉकटेल प्रेमी पग ऑफ रिव्हेंजचं’ दिग्दर्शन केलं होतं. ज्यात आशा पांचाल आणि वृत्ती ठक्कर महत्त्वाच्या भूमिकेत होते.






























