Homeमहाराष्ट्रपुणे गुन्हेगारीच्या बातम्या पुण्यातील कुख्यात गुंडांशी झालेल्या चकमकी 15 मकोकोसह दाखल झालेल्या...

पुणे गुन्हेगारीच्या बातम्या पुण्यातील कुख्यात गुंडांशी झालेल्या चकमकी 15 मकोकोसह दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांसह


गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यात   कुख्यात गुंडाचा एन्काऊंटर झाला आहे. सराईत गुन्हेगार टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख उर्फ हट्टी रहीम शेख हा पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. शाहरुख हा काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या  गुन्ह्यामध्ये फरार होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने गोळीबार केला. त्यानंतर चकमक झाल्यानंतर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मोहोळजवळ लांबोटीत त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.

शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय ३०, रा. गल्ली नं. २३/ए,सय्यदनगर, हडपसर, पुणे) असे ठार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर पुणे शहरातील हडपसर, वानवडी, कोंढवा,काळेपडळ पोलीस ठाण्यांत खून, दरोडा, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर ‘मोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.

शेख हा सराईत गुंड टिपू पठाण याच्या टोळीचा साथीदार होता. त्याच्यावर हडपसर भागातील काळेपडळ पोलीस ठाण्यात गंभीर  गुन्हे दाखल आहेत.  डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोकड चोरून नेल्याप्रकरणी नोमान सय्यद (वय २०, रा. हडपसर) आणि शाहरुख शेख याच्यावर हा गुन्हा दाखल केला होता. उमर शकील शेख (वय २१, रा. मोहंमदवाडी) यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादी  फूड डिलिव्हरी अँपवरून आईस्क्रीमची डिलिव्हरी देण्यासाठी मोटार सायकलवरून जात होते. त्यावेळी तीनजणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील मोबाईल आणि 630 रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. विरोध केल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार केल्यामुळे  त्यांच्या कानावर लागला होता. त्यानंतर आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी करून दहशत पसरविली होती. ही घटना सय्यदनगर येथे 14 मार्चला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. काळेपडळ पोलिसांनी याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून सराईत नोमान सय्यद याला अटक केली होती.

नोमान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी ६ गुहे दाखल आहेत. शाहरुख ऊर्फ हट्टी पसार झाला होता. तो मार्च महिन्यापासून फरार होता. तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ असलेल्या लांबोटी गावामध्ये नातेवाईकाला भेटण्यासाठी येणार  असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे पथकासह मोहोळ घटनास्थळी गेले. मोहोळ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी लांबोटी येथे जाऊन शाहरुख याला पकडण्याचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास  शाहरुख याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा सांगण्यात येत आहे.

रविवारी (दि.१५) पहाटे पाचच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी ही माहिती सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली. शाहरुख याला जखमी अवस्थेत सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शाहरुख याचा मृत्यू झाला. एन्काऊंटरच्या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहोळ पोलीस ठाण्यावर दाखल झाले.  घटनेमुळे परिसरात  खळबळ उडाली असून, पोलिसांनी कारवाईनंतर लांबोटी गावात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबतच गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

तेलंगणा हत्याकांडातील आरोपी राजकुमार मृत सापडला; POCSO प्रकरणातील संशयित

0
हैदराबाद7 तासांपूर्वीलिंक कॉपी करातेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सहा लोकांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पी राजकुमार सोमवारी मृत अवस्थेत आढळला. पोलिसांना त्याचा मृतदेह कोठूर पोलीस ठाण्याच्या...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!