Homeमनोरंजनआयपीएल 2025 नंतर आरसीबी मालकांनी अहवालानुसार फ्रँचायझी विक्री करण्याचा विचार केला

आयपीएल 2025 नंतर आरसीबी मालकांनी अहवालानुसार फ्रँचायझी विक्री करण्याचा विचार केला


रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू: आयपीएल 2025 (IPL 2025) ही स्पर्धा 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाने जिंकली. पंजाब किंग्सला पराभूत करून त्यांनी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. मात्र या विजयानंतर आता ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार आरसीबीचे मालक आता फ्रेंचायझी विकायच्या तयारीत आहेत. जर आरसीबीचा संघ विकला जातो तर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा असू शकतो, कारण आरसीबीच्या मालकांनी फ्रेंचायझीची विक्री करण्यासाठी एक मोठी किंमत ठरवली आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार यूनाइटेड स्पिरिट लिमिटेड कंपनीने आरसीबी फ्रेंचायझी 2 अरब डॉलर म्हणजेच 17 हजार कोटींना विकण्याचा विचार केला आहे. आरसीबी संघाचे मालक मॅकडॉवल्स व्हिस्की बनवणारी कंपनी यूनाइटेड स्पिरिट लिमिटेड ही आहे. यूनाइटेड स्पिरिट लिमिटेड कंपनी ही पूर्वी विजय माल्याची होती. मात्र विजय माल्या कर्जबाजारी झाल्यावर ही कंपनी ब्रिटिशच्या डियाजियो कंपनीने खरेदी केली. डियाजियोकडेच सध्या आरसीबीची मालकी आहे.

2008 मध्ये किती होती आरसीबीची किंमत?

आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती त्यावेळी आरसीबीची किंमत 111.6 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 476 कोटी इतकी होती. तेव्हा आरसीबी ही आयपीएलमधील दुसरी सर्वात सर्वात महागडी टीम होती. विजय माल्याने त्याची कंपनी यूनाइटेड स्पिरिट लिमिटेडला आरसीबीचा मालकी हक्क दिला होता. 2014 मध्ये ब्रिटिश कंपनी डियाजियोने यूनाइटेड स्पिरिट लिमिटेडमधील मोठा हिस्सा खरेदी केला आणि त्यानंतर 2016 मध्ये कंपनीने संपूर्ण आरसीबी फ्रेंचायझी विकत घेतली.

हेही वाचा : Video : Out होताच आर अश्विनची आदळआपट, महिला अंपायरवर काढला राग, ठोठावली शिक्षा

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा :

आरसीबी संघ 17 हजार कोटींमध्ये विकला जातो तर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा असेल. यापूर्वी कोणताही संघ एवढ्या मोठ्या किंमतीला विकला गेला नव्हता. आयपीएलमध्ये 2022 मध्ये दोन नवीन संघ सामील झाले. लखनऊ सुपर जाएंट्स संघाला RPSG ग्रुप ने 7,090 कोटींना खरेदी केलं. तर CVC कॅपिटलने गुजरात टाइटंसला 5,625 कोटींना विकत घेतले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- 13 वर्षांच्या मुलींना वाचवा:याच वयात मासिक पाळी सुरू होते, खरे प्रेम...

0
यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी सांगितले- मी काही बोलले की ते व्हायरल होते. माझ्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नसतो. तुम्हाला सर्वोत्तम बनवणे हे...

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!