भारत राष्ट्रीय भाषा: सध्या अनेक भारतीय नेते ऑपरेशन सिंदूर संदर्भात अनेक देशांना भेट देतायत. यातून पाकिस्तानच्या दहशतवादाचा पर्दाफाश केला जातोय. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या आउटरीच कार्यक्रमाचा भाग म्हणून द्रमुक खासदार कनिमोझी करुणानिधी देखील स्पेनला सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतायत. त्यांच्यात झालेल्या चर्चेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. असं काय आहे या व्हिडीओत? सविस्तर जाणून घेऊया.
स्पेनच्या भेटीदरम्यान खासदार कनिमोझी करुणानिधी यांना भारताच्या राष्ट्रभाषेबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. ज्याचे उत्तर त्यांनी असे दिले की तुम्हालाही ऐकून आनंद होईल.
दहशतवादाबद्दल काय म्हटले?
यावेळी त्यांना दहशतवादाविषयी प्रश्न विचारण्यात आला. आपल्या देशात बरेच काही करणे बाकी आहे आणि आपल्याला ते करायचे आहे. दुर्दैवाने आपली दिशाभूल केली जातेय. आपल्याला दहशतवाद, युद्ध यासारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागतंय जे पूर्णपणे अनावश्यक आहे. भारत एक सुरक्षित ठिकाण असून काश्मीर देखील सुरक्षित राहील याची खात्री सरकार करत असल्याचे उत्तर यावेळी देण्यात आले.
भारत सुरक्षित आहे. ते काहीही प्रयत्न करू शकतात पण ते आपल्याला मार्गावरून हटवू शकत नाहीत. काश्मीर सुरक्षित राहील याची खात्री आहे. भारतीय म्हणून आपल्याला हा संदेश स्पष्ट करावा लागेल असेही त्यांनी पुढे सांगितले.
भाषेबद्दल विचारला गेला प्रश्न
माद्रिदमधील भारतीय डायस्पोराच्या एका सदस्याने त्यांना भाषेबद्दल हा प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, भारताची राष्ट्रभाषा एकता आणि विविधता आहे. हाच संदेश हे शिष्टमंडळ जगाला देतंय. आणि याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेण्ड होतोय. भारताची राष्ट्रभाषा ‘विविधतेत एकता’ आहे. हे उत्तर देऊन त्यांच्या शिष्टमंडळाने जगाला भारतात एकात्मता असल्याचा संदेश जगाला दिला.
#वॉच | माद्रिद, स्पेन: भारतीय डायस्पोराला संबोधित करताना डीएमकेचे खासदार कनिमोझी म्हणाले, “भारताची राष्ट्रीय भाषा ही एकता आणि विविधता आहे. हा संदेश हा संदेश जगाला आणतो, आणि ही आजची सर्वात महत्वाची गोष्ट आहे …” pic.twitter.com/cvbra99wk3
– वर्षे (@अनी) 2 जून, 2025
हा प्रश्न का विचारण्यात आला?
तामिळनाडूतील द्रमुक सरकार आणि केंद्र सरकारमध्ये भाषेवरून तीव्र संघर्ष झाला. विशेषतः राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 मध्ये त्रिभाषा सूत्रामुळे चांगलीच खडाजंगी झाली. या सर्व पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेबद्दल हा प्रश्न विचारण्यात आला.
स्पेन हा कनिमोझी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या 5 देशांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा आहे. त्यानंतर शिष्टमंडळ भारतात परतेल. या टीममध्ये समाजवादी पक्षाचे खासदार राजीव कुमार राय, भाजपचे ब्रिजेश चौटा, आम आदमी पक्षाचे अशोक मित्तल, आरजेडीचे प्रेमचंद गुप्ता आणि माजी मुत्सद्दी मंजीव सिंग पुरी यांचा समावेश आहे.




























