Homeमहाराष्ट्रजम्मू काश्मीरमधील पहलगम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पळगम दहशतवादी हल्ल्याची ताज्या बातमी...

जम्मू काश्मीरमधील पहलगम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पळगम दहशतवादी हल्ल्याची ताज्या बातमी मराठी पुनेकर कुटुंब


मराठी मधील पहलगम दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा जवान सतर्क झाले असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेष विमानाने घटनास्थळी रवाना झाले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान या हल्ल्यात महाराष्ट्राच्या पुण्यातील कुटुंब जखमी झालं आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पुण्यातील पाच जणांच कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. असावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे आणि संगीता गाबोटे अशी त्यांची ओळख पटली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मिरी पोषाख घालुन फोटो काढत होतं. त्यावेळी अचानक समोर दहशतवादी आले.‌ दहशतवाद्यांनी या पर्यटकांना नावे विचारली. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.

पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असुन या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे. या कुटुंबासह पुण्यातील आणखी काही पर्यटक देखील या हल्ल्यात जखमी झालेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

दोघांचा मृत्यू झाल्याची फडणवीसांची माहिती

“पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी जीव गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना माझी मनापासून श्रद्धांजली. आम्ही शोकाकुल कुटुंबांसोबत दृढ आहोत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. आम्ही जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत,” अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदारी यांच्याशी फोन करून चर्चा केली आणि सविस्तर माहिती घेतली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दिलीप दिसले आणि अतुल मोने हे 2 पर्यटक यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एक पनवेल येथील माणिक पटेल आणि दुसरा एस. भालचंद्र राव आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे असंही ते म्हणाले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!