एलएसजी वि सीएसके: भारताचा आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव. तो त्याच्या संघाच्या तसेच इतर संघांच्या खेळाडूंवर बारीक लक्ष ठेवतो. हे वेळोवेळी त्याच्या सोशल मीडियावरून जाणवते. हेच कारण आहे की सूर्या सोशल मीडियावर दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करण्याची संधी कधीही सोडत नाही.पण यावेळी सुर्याने चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला त्याच्या शानदार कामगिरीबद्दल चिडवले आहे. सीएसकेच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने त्याच्या इंस्टाग्रामवर शिवम दुबेबद्दल एक स्टोरी शेअर केली आहे.
काय स्टोरी शेअर केली सूर्याने?
सूर्यकुमार यादवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शिवम आणि महेंद्रसिंग धोनीचा फोटो लावला आहे आणि या फोटोवर एक मजेदार कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले, ‘माही भाई- जर तुम्ही स्ट्राइक दिला तर काय करशील? दुबे- मी प्रयत्न करेन. माही भाई – जर प्रयत्न करायचेच असेल तर मीच करेल, तू फक्त धावबाद होऊ नकोस.’ शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांच्यात खूप मैत्री आहे. दुबे आणि सूर्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या एकाच संघाकडून खेळतात. हेच कारण आहे की दोघांमध्ये खूप मज्जा होत असते.
हे ही वाचा: IPL 2025: DC vs MI सामन्यात तुफान हाणामारी! महिलेने केली तरुणाची धुलाई, Viral Video
हे ही वाचा: “रोहित शर्माला कर्णधार करा…” शिर्डी साई बाबा मंदिरात पोहोचलेल्या नीता अंबानींना MI च्या चाहत्यांनी केली मोठी मागणी, Video
शिवम दुबेचा खेळ
लखनऊ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात, शिवम दुबेने सीएसकेसाठी 43 धावांची दमदार खेळी केली. दुबेने 37 चेंडूंचा सामना करत 43 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 2 षटकारही मारले. शिवम दुबे व्यतिरिक्त, संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 11 चेंडूत 26 धावा करून सामना संपवला.
हे ही वाचा: जसप्रीत बुमराह आणि करुण नायर एकमेकांशी भिडले…रोहितने मात्र युद्धभूमीवरही घेतली मजा; बघा Viral Video
लखनऊ सुपरजायंट्सने केली प्रथम फलंदाजी
त्याआधी, लखनऊ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 166 धावा केल्या. लखनऊसाठी कर्णधार ऋषभ पंतने 49 चेंडूत 63 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात, सीएसकेने 3 चेंडू शिल्लक असताना 5 विकेट गमावून 168 धावा केल्या आणि सामना जिंकला. या सिजनमध्ये सीएसकेचा 7 सामन्यांपैकी हा दुसराच विजय होता.
































