Homeदेश-विदेशअंतराळातील मानवी विष्ठेचा पुनर्वावर कसा करायचा? भन्नाट आयडीया देणाऱ्याला NASA कडून मिळणार...

अंतराळातील मानवी विष्ठेचा पुनर्वावर कसा करायचा? भन्नाट आयडीया देणाऱ्याला NASA कडून मिळणार 25 कोटी!

नासा स्पर्धा मानवी पूप: नॅशनल अ‍ॅरोनॉटीक्सअ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेत नासा अंतराळात विविध प्रयोग करत असते. त्यामुळे मानवाला अंतराल विश्वातील विविध गोष्टींचा उलगडा होतो. अंतराळ विश्वातील गोष्टींबद्दल जनजागृती व्हावी यासाठी नासा विविध स्पर्धा आयोजित करत असते. नासाने असेच एक अनोखे चॅलेंज दिले आहे. तुम्ही हे चॅलेंज स्वीकारलात तर तुम्हाला 25 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम जिंकण्याची संधी आहे. काय आहे हे चॅलेंज? सविस्तर जाणून घेऊया.

अंतराळात मानवी कचऱ्याचा पुनर्वापर कसा करायचा? याचे मार्ग शोधण्याचे आवाहन नासाने केले आहे. योग्य मार्ग शोधणाऱ्या व्यक्तीला 3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 25 कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल. याला लूना-रीसायकल चॅलेंज असे म्हटले जातंय. चंद्रावर किंवा लांब अंतराळ प्रवासादरम्यान मानवी विष्ठा, मूत्र आणि उलट्यांचा पुनर्वापर करू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन नासाकडून करण्यात आले आहे.

चॅलेंजचे महत्व काय?

नासाने दिलेल्या माहितीनुसार, अपोलो मोहिमेदरम्यान चंद्रावर मानवी मलमूत्राच्या 96 पिशव्या सोडण्यात आल्या होत्या. आता अवकाशातील कचऱ्याचा ढीग वाढू नये असे नासाला वाटतंय. भविष्यातील मोहिमांमध्ये कचरा पुनर्प्राप्त करण्यास मदत करू शकेल असे तंत्रज्ञान विकसित करणे हा नासाच्या चॅलेंज मागचा उद्देश आहे. चंद्रावरील दीर्घकालीन वसाहतींमध्ये हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल अशी नासाला अपेक्षा आहे. नासाने त्यांच्या वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ‘आपण दीर्घकाळ अंतराळात राहण्याची तयारी करत आहोत. यासाठी कचरा कमी करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे खूप महत्वाचे आहे. कोणताही कचरा पृथ्वीवर परत आणला जाऊ नये याची आम्हाला खात्री करायची असल्याचे’ नासाने म्हटलंय. नासाने लोकांना अंतराळातील मानवी विष्ठेचा पुनर्वापर या समस्येवर उपाय शोधण्यास सांगितले आहे. सध्या नासा पहिल्या फेरीत पाठवलेल्या आयडीयाची तपासणी करतंय. यातील सर्वोत्तम कल्पना निवडून पुढील फेरीसाठी पाठवल्या जातील. हे चॅलेंज जिंकणाऱ्या टीमला 3 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस मिळेल. हे चॅलेंज अवकाशात तर मदत करेलच सोबत पृथ्वीवर पुनर्वापराचे नवीन मार्ग देखील यामाध्यमातून मिळेल, असे नासाने म्हटलंय.

पृथ्वीसाठीही फायदेशीर

पृथ्वीवरील कचऱ्याच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी या चॅलेंजच्या माध्यमातून नवीन कल्पना मिळू शकते. यामुळे लहान लहान टीममधून नवीन पुनर्वापर तंत्रे पुढे येऊ शकतात. जी कमी विषारी कचरा सोडतील आणि अधिक कार्यक्षम असतील. हे आव्हान जगभरातील शास्त्रज्ञ, अभियंते आणि सामान्य लोकांसाठी एक उत्तम संधी आहे. या अनोख्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लोक उत्साहाने सहभागी होतील असा नासाला विश्वास आहे. सौ.झीन्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!