Homeमहाराष्ट्रशरद पवार कालही दैवत होते आणि आजही दैवत, अजित पवारांच्या विधानाने भुवया...

शरद पवार कालही दैवत होते आणि आजही दैवत, अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या, काका-पुतण्यामध्ये चाललंय काय?

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा आणि विधानसभेला तर पवार विरुद्ध पवार थेट सामना पाहायला मिळाला. मात्र आता अजित पवारांनी शरद पवारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार हे कालही दैवत होते आणि आजही दैवत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे पवार काका-पुतण्यामध्ये चाललंय काय असा प्रश्न पडला आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मोठा राजकीय सामना पाहायला मिळाला. पवार काका पुतण्याने एकमेकांवर टीकास्त्र डागण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र मागील काही दिवसांपासून अजित पवारांनी शरद पवारांवर काहीसं प्रेम आल्याचं दिसत आहे. बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार हे आपले दैवतच असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे काल ही दैवत होते आणि त्यांना आजही दैवत मानतो असं विधान अजित पवारांनी केलं आहे.

आपले काका चांगले आहेत हे म्हणण्याशिवाय आता त्यांच्याकडे पर्याय नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

अजित पवारांनी काका आपले दैवत आहेत. काकांची पुण्याई आपल्या मागे आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे अजितदादांमागे काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांना मागील काही दिवसांपासून काका शरद पवारांच्या प्रेमाचा उमाळा आल्याचं दिसत आहे. पिंपरी-चिंचवडच्या आधी अजितदादांनी बीडच्या कार्यक्रमातही आई-वडिल आणि चुलत्याच्या आशिर्वादाने आपलं चांगलं चालल्याचं वक्तव्य केलं होतं.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार काका पुतण्यामध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं होतं. मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर वातावरण बदललं आहे. शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी अजित पवारांनी दिल्लीतील निवासस्थानी सहकुटुंब जात पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बीडमधील चुलत्याचा आशिर्वाद आणि आता पिंपरी-चिंचवडमधील पवार कालही दैवत आणि आजही ही अजित पवारांची वक्तव्य खूपच बोलकी आहेत.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!