Homeमहाराष्ट्रSanjay Raut : मोदींची विष्णूशी तुलना केलेली चालते का? ‘त्या’ वक्तव्यावरून संजय...

Sanjay Raut : मोदींची विष्णूशी तुलना केलेली चालते का? ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा सवाल


नरेंद्र मोदीवरील संजय फेअर: संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची श्रीकृष्णासोबत तुलना केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. श्रीकृष्णाशी इतरांची तुलना करणं योग्य नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी राऊतांवर शरसंधान साधलं. काँग्रेस नेते सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर बावनकुळेंनी थेट निशाणा साधला होता.

चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय. तसंच उद्धव ठाकरेंची भगवान श्रीकृष्णासोबत तुलना केल्याच्या आरोपांवर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर उदय सामंतांनी देखील त्यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं, मात्र, सामंतांच्या टीकेवरही संजय राऊतांनी पलटवार केलाय. तसंच नरेंद्र मोदींची भगवान विष्णूंसोबत तुलना केलेली चालते का? असा सवाल देखील संजय राऊतांनी केलाय.

संजय राऊत म्हणाले, ‘कोणीही कोणाचीही कोणाबरोबरही तुलना केलेली नाही. श्रीकृष्णाची असंख्य नावं आहेत. त्यात उद्धव हे देखील एक नाव आहे. आम्ही कधी बाळासाहेब ठाकरे यांची देवाशी तुलना केली नाही. मात्र, मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का? असा माझा प्रश्न आहे.” यावर उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केलं तेव्हा संजय राऊत यांना पोटशूळ का उठला? कोणाचीही देवाशी तुलना केल्याने देवपण येत नाही.’

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी कंठशोष केला. राऊतांनी भगवान श्रीकृष्णासोबत तुलना केल्याचा आरोप करण्यात आला मात्र, यानंतर संजय राऊतांनी देखील भाजप नेत्यांनी मोदींची भगवान विष्णू, छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याची वक्तव्यांची आठवण करुन देत प्रत्युत्तर दिलंय.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्याच्या खासदार कंगना रणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मोदी हे सामान्य नागरिक नसून ते ईश्वराचा अवतार आहेत असं कंगना यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील कंगना यांनी मोदींची भगवान श्रीकृष्णाशी तुलना केली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!