Homeमनोरंजनमेटा ब्लॉक्स इन्स्टाग्राम लाइव्ह वैशिष्ट्य किंवा 16 वर्षाखालील किशोरवयीन मुलांनी फेसबुकवर सुरक्षितता...

मेटा ब्लॉक्स इन्स्टाग्राम लाइव्ह वैशिष्ट्य किंवा 16 वर्षाखालील किशोरवयीन मुलांनी फेसबुकवर सुरक्षितता उपाय वाढविले आहेत


इन्स्टाग्रामबद्दल मेटा मोठा निर्णयः व्हॉट्सअपनंतर तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली सोशल नेटवर्किंग साईट म्हणजे इन्स्टाग्राम! दिवसातील अनेक तास या इन्स्टाग्रामवरील रिल्स पाहण्यात जातात. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर 16 वर्षांखालील युझर्सचीही संख्या लक्षणीय आहे. याचीच दखल घेत आता इन्स्टाग्रामने महत्त्वाचा नियम बदलला आहे. याचा थेट परिणाम 16 वर्षांखालील युझर्सला बसणार आहे.

या दोन गोष्टींवर बंदी

नव्या नियमानुसार, 16 वर्षांखालील मुलांना त्यांच्या पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टाग्रामवरुन आता थेट प्रक्षेपण (लाइव्हस्ट्रीम) करता येणार नाही. तसेच नग्नतेशी संबंधित ‘कंटेंट’ म्हणजेच न्यूडिटी मार्क केलेला कंटेटं त्यांना पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवताही येणार नाही.

सध्या या देशांमध्ये होणार लागू

फेसबुक, इन्स्टाग्रामची मातृक कंपनी असलेल्या ‘मेटा’ने 18 वर्षांखालील वापरकर्त्यांची सुरक्षितता अधिक सक्षम करण्याच्या हेतूने हे बदल केले आहेत. सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे बदल लागू करण्यात आले असून काही महिन्यांत ते जगभरात अमलात येतील.

या विशेष अपडेट्सही देण्यात आल्यात

नव्या सुधारणांनुसार इन्स्टाग्रामवरील खातं खासगी ठेवता येणार आहे. तसेच अनोळखी व्यक्तींकडून येणारे डायरेक्ट मेसेज ब्लॉक करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. हाणामारीसारखी संवेदनशील दृशांचा रिच मर्यादित करण्यात आला आहे. 60 मिनिटं झाल्यानंतर अ‍ॅप बंद करण्याची आठवण करुन देणारे नोटिफिकेशन येतील. तसेच रात्रीच्या वेळेस नोटिफिकेशन्स येणार नाहीत, अशीही सोय करण्यात आली आहे.

वेळेचं योग्य नियोजन होईल याला प्राधान्य

मेटाच्या मालकीच्या फेसबुक व मेसेंजरवरील किशोरवयीन युझर्सची खातीसुद्धा अशाच प्रकारचे स्वयंचलितपणे संरक्षित करण्यात येतील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. अनुचित व अनावश्यक भाग वगळून संदेशांची देवाण-घेवाण करता येईल. तसेच किशोरवयीन युझर्सचा वेळ योग्यरीत्या वापरला जात आहे की नाही याची खात्री करुन घेतली जाईल. सप्टेंबरपासून या नियोजनाद्वारे किमान 54 लाख किशोरवयीन युझर्सची खाती सुरु करण्यात आली आहेत, असे ‘मेटा’ने सांगितले आहे.

खोटं वय वापरणारे किशोरवयीन वापरकर्ते

मेटाबरोबरच अनेक सोशल नेटवर्किंग साईट्स किशोरवयीन युझर्सच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेताना दिसत आहेत. मात्र खोटं वय टाकून सोशल नेटवर्किंगसाईटवर सक्रीय असलेल्या किशोरवयीन युझर्सची संख्याही जास्त आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!