Homeमहाराष्ट्रहर्षवर्धन पाटील तुतारी सोडून हाती पुन्हा कमळ घेणार? भाजप प्रदेशाध्यक्षांसोबतच्या बैठकीत नेमकं...

हर्षवर्धन पाटील तुतारी सोडून हाती पुन्हा कमळ घेणार? भाजप प्रदेशाध्यक्षांसोबतच्या बैठकीत नेमकं काय झालं?


हर्षवर्धन पाटील: इंदापूरमधील नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरवापसीची चर्चा सुरु झाली आहे. हर्षवर्धन पाटलांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली, त्यानंतर या चर्चेला उधाण आलं. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कमळ सोडून हाती तुतारी घेतलेल्या हर्षवर्धन पाटलांवर भाजप नाराज दिसतेय. कारण आता पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी शरद पवारांकडेच थांबावं असं बावनकुळे यांनी सांगितलंय.

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेऊनही हर्षवर्धन पाटलांचा विधिमंडळ प्रवेशाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. इंदापुरातून पुन्हा एकदा दारुण पराभव झाल्यानंतर तेल गेलं आणि तूपही गेलं अशी राजकीय अवस्था हर्षवर्धन पाटलांची झाली. अशातच हर्षवर्धन पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. या भेटीमुळं हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये घरवापसी करणार का अशी चर्चा सुरु झालीये. हर्षवर्धन पाटलांनी मात्र मतदारसंघातल्या महसुली सुनावणीसाठी भेटल्याचं सांगितलं.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं. हर्षवर्धन पाटलांना भाजपमध्ये घेणार नसल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांसोबतच राहावं असा सल्लाही त्यांनी दिलाय.

सत्तेची सावली नसल्यानं अनेक राजकीय नेत्यांची कोंडी झालीये. हर्षवर्धन पाटील 2014पासून विधिमंडळाची पायरी चढले नाहीत. पवारांकडं गेल्यास विधिमंडळाची वाट सुकर होईल असं त्यांना वाटलं होतं. पण तो प्रयोगही फसल्यानं आता हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपकडं परत जाण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येतंय. पण भाजपनं मात्र त्यांच्यासाठी दरवाजे बंद असल्याचं सांगितल्यानं पाटलांची अवस्था बिकट झाल्याचं सांगण्यात येतंय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!