HomeमनोरंजनGhibli ट्रेंडमुळे डिजिटल प्रायव्हसी धोक्यात? AI कंपन्या विकतायत तुमचा डेटा? जाणून घ्या!

Ghibli ट्रेंडमुळे डिजिटल प्रायव्हसी धोक्यात? AI कंपन्या विकतायत तुमचा डेटा? जाणून घ्या!


गिबली ट्रेंड: सोशल मिडीयावर सध्या गिबली ट्रेंड चांगलाच धुमाकुळ घालतोय. AI प्लॅटफॉर्म किंवा ChatGPT द्वारे आपल्या फोटोंचं सुंदर अॅनिमेशन केलं जातंय.या गिबलीने अनेकांना प्रचंड वेड लावलंय, मात्र सोशल मिडीयावरचा हा ट्रेंड तुमची खासगी माहिती चोरतीये. AI कंपन्यांवर लोकांचा डेटा विकल्याचा आरोप होतोय.

सध्या देशभरात गिबलीचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय ठरतोय. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आपले गीबली स्टाइलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सुंदर बॅकग्राऊंड, फोटोतील टपोरे डोळे, पेस्टल कलर्स यामुळे कुणालाही या फोटोजची भुरळ पडेल…पण या गिबलीच्या माध्यमातून तुमचा खासजी डेटा, तुमचे फोटो दुस-यांना विकले जातायेत. ऐकून धक्का बसेल, पण AI कंपन्यांवर हा आरोप होतोय.

चेहरा म्हणजे आपली ओळख.हे फोटो अपलोड करत आपण आपली बायोमेट्रिक माहिती अर्थात आपल्या चेह-याची ओळख निर्धास्तपणे AI कंपनीला देतोय.पण त्याचा भविष्यात वेगळ्या कारणसाठीही वापर होण्याची शक्यता आहे. गिब्ली हे एक एआय टूल आहे.ज्यात युजरचा डेटा लाईफटाईम सेव्ह राहतो. हा डेटा कंपनी विकू किंवा शेअर करू शकते असा आरोप होतोय. डार्कवेब अथवा डिपफेकसाठी फोटोचा वापर होऊ शकतो. दरम्यान तुमच्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो.यापासून वाचण्यासाठी खबरदारी आणि काळजी घेणं महत्वाच आहं.

काय काळजी घ्याल?

सोशल मीडियावर हाय-रिझोल्यूशन फोटो अपलोड करणे टाळा. फेस अनलॉक ऐवजी पासवर्ड किंवा पिन वापरा. कोणत्याही अज्ञात ॲपला कॅमे-याचा अक्सेस देऊ नका. अ‍ॅनिमेटर आणि दिग्दर्शक हायाओ मियाझाकी, यांनी 1985 मध्ये या गिब्ली स्टाईल स्टुडीओला सुरूवात केली.त्यांनी हि कला इतकी वर्ष जोपासली मोठी केली.पण आता एआय तंत्रज्ञानामुळे एका क्षणात मियाझाकी गिब्ली फोटो तयार होतो. त्यामुळे यावर अनेकांनी आक्षेपही घेतलाय.एका कलाकाराचं काम AI ने चोरल्याचाही आरोप होतोय. या गिबलीमुळे आता मात्र तुमच्या फोटोची सुरक्षितताही धोक्यात आहे.त्यामुळे भविष्यात गिब्ली किंवा इतर ट्रेंडमध्ये वाहवत जाताना काळजी नक्की घ्या.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!