Homeमनोरंजनसायबर सिक्युरिटी आपण गिबली स्टाईल एआय प्रतिमांसाठी चॅटजीपीटी ग्रोक 3 वर वैयक्तिक...

सायबर सिक्युरिटी आपण गिबली स्टाईल एआय प्रतिमांसाठी चॅटजीपीटी ग्रोक 3 वर वैयक्तिक फोटो अपलोड करीत आहात हे महत्त्वपूर्ण चेतावणी तपासा

मनोरंजन : डिजीटल प्रायव्हसीसंदर्भातील तज्ज्ञ मंडळींनी सोशल मीडियावरुन या ‘घिब्ली’संदर्भात सावधानतेचा इशारा दिला आहे. ओपन एआय या ‘घिब्ली’ ट्रेण्डच्या माध्यमातून एआय ट्रेनिंगसाठी कोट्यवधि लोकांचे खासगी फोटो जमा करु शकते, असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एकीकडे अनेकजण सध्या हा ट्रेण्ड ए्न्जॉय करत असताना दुसरीकडे आपलं कार्टुन स्वरुपातील रुप पाहण्याच्या नादात अनेकजण स्वत:चा फेशीअल डेटा ओपन एआयकडे सोपवत असल्याने या माध्यमातून डिजीटल सुरक्षेसंदर्भात मोठा पेच भविष्यात निर्माण होऊ शकतो अशी शक्यता या तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे.

कंपन्यांना मिळणार मोफत डेटा

आर्टिफिशीअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या या फोटोंवर मालकी हक्क या कंपन्यांचा असणार आहे. त्यामुळे भविष्यात कार्टुन रेखाटणाऱ्या किंवा कलाकारांवर उपजिविकेसाठी काय करावं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या नव्या ट्रेण्डच्या माध्यमातून अपलोड केलेले फोटो या कंपन्या थेट वापरु शकतात. या प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेले फोटो वापरण्यावरुन कंपन्या कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता अगदीच धूसर असल्याचं मानलं जात आहे.

फोटो वापरण्याचा अधिकार गमावला

‘जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन’ म्हणजेच ‘जीडीपीआर’च्या माध्यमातून जगभरामध्ये एआयवर अपलोड होणाऱ्या कंटेटसंदर्भात काही सर्वसामान्य नियम तयार करण्यात आले आहेत. यामधील आर्टीकल 6.1ए नुसार लोक स्वत:हून एआयवर फोटो अपलोड करत असतील तर हे फोटो वापरण्याचा अधिकार ते या माध्यमाला देतात. यामुळे हे असले फोटो वापरण्याचा कायदेशीर हक्क युझर जेव्हा फोटो अपलोड करतो तेव्हाच ओपनएआयकडे देतो, असं म्हटलं तरी हरकत नाही. ‘टेक आणि प्रायव्हसी अकादमी’ तसेच ‘एआय’च्या सहसंस्थापक असलेल्या लुईझा झालोव्हास्की यांनी आपल्या एका एक्स पोस्टमध्ये यासंदर्भात सविस्तरपणे लिहिलेलं आहे.

ही माहिती फक्त कंपन्यांकडे असणार

ओपनएआय हे माध्यम वापरुन फोटो अपलोड करताना ज्या परवानगी दिल्या जातात. त्यामध्ये वापरकर्त्याच्या परवानगी शिवाय त्यांनी अपलोड केले फोटो आणि खासगी डेटा कंपनी गोळा करु शकते असं अटी आणि शर्थींमध्ये म्हटल्याचं, लुईझा यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. लुईसा यांनी ‘घिब्ली’च्या माध्यमातून अपलोड होणाऱ्या फोटोंमधील खासगी माहिती आणि फोटो हे ओपनएआयला सहज मिळू शकतात. तसेच या फोटोंचं मूळ कुठे आहे म्हणजेच नेमका वापरकर्ता कोण आहे याची माहिती फक्त कंपनीकडे असणार. लोकांना दिसताना केवळ कार्टून स्वरुपातील फोटो दिसणार आहे. म्हणजेच ‘घिब्ली’चा वापर करणाऱ्यांनी कंपन्यांना आपल्या खासगी फोटोंचा अधिकार दिला असून आता घिब्ली वापरलेल्या युझर्सने अपलोड केलेले त्यांचे सर्व खासगी फोटो कंपन्यांना पूर्वपरवानगीशिवाय वापरता येणार आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

माहितीची विक्री

‘हिमाचल सायबर वॉरिअर्स’ नावाच्या स्वयंघोषित सायबर सुरक्षा ग्रुपनेही, “घिब्ली वापरताना काळजी घ्या. तुम्ही गरजेपेक्षा अधिक किंमत तर मोजत नाहीत ना? तुमचे फोटो हे चुकीच्या कारणासाठी आणि वाटेल तसे वापरले जाऊ शकतात. तुमच्या परवानगीशिवाय या फोटोंचा वापर एआय ट्रेनिंगसाठी होऊ शकतो. ही माहिती डेटा ब्रोकर्सकडून जाहिरातदारांना विकली जाऊ शकते. सायबर स्मार्ट राहा. तुम्ही प्रायव्हरी मोलाची आहे,” असा सल्ला दिला आहे.

आता ‘घिब्ली’संदर्भातील सुरक्षेवरुन चर्चा होऊ लागली असली तरी याबद्दल ओपनएआयने कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही.(सौ.झी.न्यूज)

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मंगळवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या व्यक्तींना प्रमोशन आणि मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू...

0
मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा पुरस्कार मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा आर्थिक लाभ...

25 ऑक्टोबरचे टॅरो राशिफळ:वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे...

0
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना बढती, नवीन करार मिळू शकतो, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या...

0
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या नोकरदार लोकांना बढतीचे योग आहेत. वाणिज्य क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन करार, तर फ्रीलान्सर्सना नवीन प्रकल्प मिळू शकतो....

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!