Homeमनोरंजनसोशल मीडिया मेटा नवीन पॉलिसी वापरकर्त्यांना आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रवेश करण्यासाठी...

सोशल मीडिया मेटा नवीन पॉलिसी वापरकर्त्यांना आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रवेश करण्यासाठी पैसे देण्याची आवश्यकता असू शकते

मनोरंजन : फेसबुक, इंस्टाग्राम न्यूज : सोशल मीडियाच्या उपलब्धतेनंतर सारं जग एका वेगळ्या पद्धतीनं एकमेकांची जोडलं गेलं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावरील माणसाची माहिती याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी सहजपणे मिळू लागली. एक ना अनेक अॅप्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची व्याप्ती नेमकी कुठवर आहे याचाच अंदाज नेटकऱ्यांना आला. आता मात्र त्यांच्या याच सोशल मीडियावरील मनसोक्त वावरण्यावर नव्या धोरणाचं सावट येणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

काय आहे हे नवं धोरण?

येत्या काळात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी युजर्सकडून काही शुल्क आकारण्याचं धोरण राबवण्य़त येऊ शकतं. मेटानं घेतलेल्या या निर्णयानंतर अनेक युजर्सच्या चिंतेत भर पडली असून, काही वृत्तांनुसार मेटा यूरोपियन यूनियन (EU) मधील युजर्ससाठी जाहिरातमुक्त अनुभवाच्या हेतूनं दर महिन्याला जवळपास 14 डॉलर ( 1,190 रुपये)आकारण्याची योजना आखत आहे. जाहिरातींसह सर्फिंगचा अनुभव घेणाऱ्यांसाठी ही रक्कम इथं लागू नसेल.

अधिकृत माहितीनुसार मेटा एक कॉम्बो ऑफरही लाँच करणार असून, यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचं अॅड फ्री वर्जनसुद्धा 17 डॉलर इतक्या किमतीला उपलब्ध असेल. ही सुविधा फक्त डेस्कटॉप युजर्ससाठी लागू असेल असंही सांगण्यात येत आहे. युरोपियन युनियनकडून टेक कंपन्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी म्हणून मेटानं हे पाऊल उचललं असून, फेसबुक आणि गुगलवर युजर्सची पसंती आणि त्यांच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीच्या आधारे टार्गेटेड जाहिराती दाखवून पैसे कमवण्याच्या धोरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी युजर्सच्या ब्राऊजिंगवर आधारित जाहिराती दाखवणं थांबवण्याच्या सूचना युरोपियन युनियननं सोशल मीडिया कंपन्यांना केल्या होत्या.

Subscription No Ads (SNA) मॉडल आहे तरी काय?

युरोपियन युनियननं लागू केलेल्या नव्या जाहिरातींच्या नियमांच्या धर्तीवर टेक कंपन्यांना राजस्व कायम ठेवण्यासाठी एक सब्सक्रीप्शन मॉडेल सुरू करावं लागणार आहे. याचाच अर्थ असा की, जाहिरातींशिवाय सोशल मीडिया वापरण्यासाठी युजर्सना एक ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. याआधी 2023 मध्ये सदरील प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. तेव्हा आता येत्या काळात Subscription No Ads (SNA) लागू करण्यासाठी युरोपियन यूनियन मेटाला कसं मार्गदर्शन करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मेटानं यावर आपली भूमिका स्पष्ट करताना जाहिराती दाखवण्यापूर्वी युजर्सची परवानगी घेत परवानगी नसल्यास पर्सनलाईज्ड जाहिराती दाखवण्यात येणार नाहीयेत. दरम्यान कोणत्याही कंपनीनं नियमांचं पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा युरोपियन युनियनच्या वतीनं देण्यात आला आहे. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!