Homeमनोरंजनमुंबईच्या महिलेने 3 लाख रुपये lakh 40 हजार रुपये दिले

मुंबईच्या महिलेने 3 लाख रुपये lakh 40 हजार रुपये दिले


मुंबई बाई फसली: मुंबईतील एका तरुणीने ब्रेकअपच्या भीतीने सायबर फसवणुकीमध्ये साडेतीन लाख रुपये गमावल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. आपला प्रियकर आपल्याशी नीट वागत नसल्याने सदर तरुणी अस्वस्थ होती. प्रियकराचे इतर कुणावर तरी प्रेम असावे, असा तिला संशय होता. मनात सातत्याने नको तेच विचार येत असल्याने तिने सोशल मीडियावरील एका जाहिरातीच्या माध्यमातून मदत घेण्याचं ठरवलं.  ‘ऑनलाइन भविष्य जाणून घ्या’ अशी जाहिरात या तरुणीच्या नजरेस पडली. तिथे आपली खासगी माहिती देऊन रितसर नोंदणी केल्यावर तिने प्रियकराबाबत कथित ज्योतिषांना विचारले. मात्र तुझ्यावर आणि तुझ्या प्रियकरावर काळी जादू करण्यात आली आहे, असे सांगून पूजाविधीसाठी तिच्याकडून तब्बल साडेतीन लाख उकळण्यात आले. नंतर आपली फसवणूक झाल्याचं या तरुणीच्या लक्षात आलं.

नेमकं घडलं काय?

सांताक्रूझ परिसरात राहणारी तन्वीची (बदललेले नाव) मागच्या वर्षी एका तरुणाशी ओळख झाली. ओळखीतून दोघांमध्ये मैत्री आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सुरुवातीला या तरुणाचं तन्वीबरोबरचं वागणं ठीक होतं, मात्र काही दिवसांनी तो तिला टाळू लागला. भेटायला गेल्यावर या तरुणाचा प्रियकर तिच्याशी नीट वागत नसल्याने त्याचे दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याचा तिला संशय वाटू लागला. मनात वेगवेगळे विचार घुटमळत असताना काही दिवसांपूर्वी या तरुणीला इन्स्टाग्रामवर एक स्टोरी दिसली. ‘251 रुपये भरून करिअर आणि रिलेशनशिपची माहिती जाणून घ्या’, असं नमूद केलेली जाहिरात दिसली. प्रियकराला आपलेसे करण्यासाठी तरुणीने या जाहिरात दिलेल्या क्रमांकावर संपर्क करुन मदत घेण्याचं ठरवलं. या जाहिरातीनुसार तिने 251 रुपये भरून नोंदणी केली. त्यानंतर तरुणीने स्वत:चा आणि प्रियकराला फोटो व नावं पाठवली.

काळी जादू केल्याचा दावा

पैसे आणि माहिती पाठवल्यानंतर एका व्यक्तीचा तन्वीला फोन आला. तुमच्या प्रियकरावर कुणीतरी काळी जादू केली आहे. या काळ्या जादूच्या प्रभावामुळे तो तुमच्या सोबत राहण्यास तयार होत नाही. तो तुमच्याशी नीट वागतही नाही, असे या व्यक्तीने सांगताच तन्वी त्याच्या बोलण्यात अडकत गेली. तन्वीने कोणतीही खातरजमा न करता या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. प्रियकरावर झालेली काळी जादू मेणबत्ती जाळून टाकते, असा दावा या व्यक्तीने केला. मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे तिला सांगण्यात आले. त्यानुसार तिने दिलेल्या बँक खात्यामध्ये पैसे या व्यक्तीला पाठविले.

प्रियकरासोबतचा संपर्क तुटला

त्यानंतर ऑनलाइन पूजाविधीचे कारण सांगून या कथित ज्योतिषाने वारंवार तन्वीकडून पैसे घेतले. सुमारे साडेतीन लाख खर्च करूनही या तरुणीच्या जीवनात काही बदल झाला नव्हता. याचदरम्यान तिचा प्रियकरासोबतचा संपर्क कायमचा तुटला. मात्र फसवणूक करणाऱ्याने ‘त्याचा फोन तुला नक्की येईल, त्यासाठी थोडे थांबावे लागेल. आणखी काही विधी करावे लागतील आणि त्यासाठी राजस्थानला यावे लागेल,’ असे या कथित भविष्यकाराने तन्वीला सांगितले. आता मात्र तन्वीला सर्व काही संशयास्पद वाटल्याने तिने अधिक माहिती काढली असता हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे तिच्या लक्षात आले.

अखेर पोलीस तक्रार

तन्वीने वाकोला पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे फसविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!