Homeमनोरंजनअवघ्या 15 रुपयांत 70 किमी धावेल स्कूटर; स्टायलिश, वजनाने हलकी आणि किंमत...

अवघ्या 15 रुपयांत 70 किमी धावेल स्कूटर; स्टायलिश, वजनाने हलकी आणि किंमत फक्त…’

मनोरंजन : टीव्हीएस आयक्वे: सध्या पेट्रोलचे दर काही कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे गाडी बाहेर काढताना खूप विचार करावा लागतो. अशावेळी अनेकजण आता पेट्रोलला पर्यायी गाड्यांचा विचार करु लागले आहेत. तुम्हीदेखील वाढत्या पेट्रोलच्या किंमतींना त्रासला असाल, स्टायलिश बाईक शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बाईकप्रेमींसाठी टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आली आहे. आकर्षक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे या बाईकची चर्चा जोरात आहे. खासकरुन महिलांमध्ये या स्कूटरची लोकप्रियता झपाट्याने वाढतेय. तसेच या स्कूटरची मागणी देखील वाढतेय, असं खासगी शोरूमचे व्यवस्थापक सांगतात. असं या स्कूटरमध्ये काय खास आहे? सविस्तर जाणून घेऊया.

टीव्हीएस आयक्यूबमध्ये काय खास?

टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्टायलिश आणि हलक्या डिझाइनमुळे ते चालवणे खूप सोपे होते. ही स्कूटर बॅटरीवर चालते. त्यामुळे पेट्रोलची गरज नाही. तसेच ही स्कूटर पर्यावरणपूरकदेखील आहे. तिची बॅटरी लाइफ जास्त आहे. ज्यामुळे ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर दूरवरचे अंतर कापू शकते. टीव्हीएस आयक्यूबमध्ये डिजिटल डिस्प्ले, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि अनेक अॅडव्हान्स फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही स्कूटर आणखी खास बनते.

TVS iQube ची एक्स-शोरूम किंमत किती?

माध्यमांतून समोर आलेल्या वृत्तानुसार आयक्यूबची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 17 हजार रुपये आहे. यात सरकारकडून 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ज्यामुळे स्कूटरची किंमत 1 लाख 7 हजार रुपयांपर्यंत कमी होते. 30 हजार रुपयांचे डाउन पेमेंट करून तुम्ही स्कूटर घरी आणू शकता.

एका चार्जवर किती अंतर कापेल?

ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 70 ते 75 किलोमीटर धावू शकते. स्कूटर चार्ज करण्याचा खर्च फक्त 15 ते 20 रुपये आहे. ज्यामुळे पेट्रोलच्या तुलनेत तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरु शकते.

स्कूटर महिलांमध्ये का लोकप्रिय?

टीव्हीएस आयक्यूब महिलांसाठी एक उत्तम पर्याय बनतेय. कारण ही स्कूटर हलकी आणि स्टायलिश आहे. ही स्कूटर चालवायला खूप सोपी असल्याने शहरातील ट्रॅफीकमध्येही महिलांना कोणतीही अडचण येत नाही. तसेच बॅटरीवर चालणारी असल्याने, पेट्रोलवरील वाढत्या खर्चापासूनही दिलासा मिळतो. अॅडव्हान्स फिचर, आकर्षक डिझाइन आणि उत्तम कामगिरीमुळे महिलांमध्ये ही स्कूटर वेगाने लोकप्रिय होत चालली आहे. जर तुम्हीही स्टायलिश, पर्यावरणपूरक आणि परवडणारी स्कूटर शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!