Homeमहाराष्ट्रखुलताबाद येथे 77 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात; उसळला देशभक्तीचा सागर:शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा,...

खुलताबाद येथे 77 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात; उसळला देशभक्तीचा सागर:शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण‎

खुलताबाद तालुक्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला. २६ जानेवारीला तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण झाले. सर्वत्र देशभक्तीचे वातावरण होते. मुख्य ध्वजारोहण तहसील कार्यालयात तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत गायले. लोकशाही, संविधान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी नाईक यांनी ध्वजारोहण केले. ग्रामीण विकास आणि प्रशासनातील जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. खुलताबाद नगरपालिकेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमेर पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपनगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्यात आला. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम झाले. घृष्णेश्वर विद्यालय, कमला नेहरू माध्यमिक विद्यालय, मौलाना आझाद हायस्कूल, चिस्तिया महाविद्यालय, कोहिनूर महाविद्यालय, तेजादित्य पब्लिक स्कूल, आयडियल स्कूल, मुक्तानंद विद्यालय, यशोदिप विद्यामंदिर, आयटीआय कॉलेज, जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम झाले. शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमेर पटेल आणि नगरसेवकांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. या सन्मानामुळे शहरात सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. तहसील कार्यालयात ध्वजारोहणानंतर विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. वीरांच्या बलिदानाची आठवण करून देत संविधानाचे महत्त्व सांगण्यात आले. ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तहसील कार्यालयातील कार्यक्रमास तहसीलदार संतोष गुट्टे, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, तालुका कृषी अधिकारी डी. एस. तारगे, मुख्याधिकारी समीर शेख, भद्रा मारुती संस्थान अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, नगराध्यक्ष आमेर पटेल, माजी नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, नगरसेवक गजानन फुलारे, मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन, अनीस जागीरदार, अयाज बेग, योगेश बारगळ, तौसीफ शेख, कैलास बारगळ, सुरेश मरकड, जेष्ठ समाजसेवक आबेद जहागिरदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. घृष्णेश्वर विद्यालय, कमला नेहरू, यशोदिप, मुक्तानंद विद्यालय, तेजादित्य पब्लिक स्कूलसह विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. खुलताबाद तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय कार्यालयांमध्ये देशभक्तीचा जल्लोष पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम, कृषी, लघुपाटबंधारे, सामाजिक वनीकरण, वन विभाग आदी कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिन साजरा झाला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!