Homeपुणे / पिंपरी-चिंचवडलहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित Pharmathon 2.0 ला मोठा प्रतिसाद

लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित Pharmathon 2.0 ला मोठा प्रतिसाद

पुणे ( बालेवाडी) : प्रतिनिधी पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या ‘लहू बालवडकर सोशल वेलफेर’ आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त माध्यमातून Pharmathon 2.0 ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा काल पार पडली. यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व फॉर्मसी कॉलेज, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल, केमिस्ट असोसिएशन, ड्रग इन्स्पेक्टर व FDA यांचा मोठा सहभाग राहिला. यावेळी तब्बल 6000 हून अधिक धावपटूंनी या आरोग्य चळवळीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

६ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर पार पडणाऱ्या ‘फार्माथॉन’ या आरोग्यप्रद जागरूकतेसाठीच्या मॅरेथॉनसाठी महाराष्ट्रातील फार्मासिस्ट, औषध उत्पादक आणि ८५ फार्मा कॉलेजेस यांचा सहभाग ही एक विलक्षण गोष्ट आहे. आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी आरोग्य क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे महान कार्य भाजपचे नेते, पुणे शहर चिटणीस लहु बालवडकर यांनी केले आहे.

औषध व्यवसायातील नवकल्पनांना चालना देण्यासाठी आणि फार्मा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून या भव्य मॅरेथॉन स्पर्धेकडे पाहिले जात आहे. या स्पर्धेमध्ये 3 किमी, 5 किमी, 10 किमी आणि 21 किमी अशा विविध गटांमध्ये ही धावण्याची स्पर्धा पार पडली. ही मॅरेथॉन स्पर्धा IPA Pharmathon टीमच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यामध्ये डॉ. सत्यनारायण (चेअरमन), डॉ. रविंद्र कांबळे (व्हाईस चेअरमन), प्रा. प्रविण जावळे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), आणि सागर पायगुडे (जॉईंट सेक्रेटरी) यांनी संयोजनाची धुरा सांभाळली. IPA पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बोबडे आणि खजिनदार डॉ. मारुती शेलार यांनी देखील मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. संजय चोरडिया (चेअरमन, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट), डॉ. सोहन चितलांगे (प्रभारी कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ), मा. बापू बांगर (उपायुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय), मा. गिरीश हुकारे (सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन), डॉ. राकेश सोमानी (अध्यक्ष, APTI महाराष्ट्र), मा. सचिन कांबळे (FDA नवी मुंबई) आणि आतिश सरकाळे ( सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, गोंदिया) यांचा समावेश होता.

मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर आणि पर्ण पेठे या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले. या सेलिब्रिटींनी उपस्थित राहून धावपट्टूंना प्रोत्साहन दिले आणि कार्यक्रमात रंगत आणली. Pharmathon 2.0 ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा न राहता, फार्मा समुदायाच्या माध्यमातून आरोग्य आणि व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक प्रेरणादायी सामाजिक चळवळ ठरली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!