Homeमुळशीमुळशीच्या आखाड्यात कुस्तीचा ऐतिहासिक जल्लोष

मुळशीच्या आखाड्यात कुस्तीचा ऐतिहासिक जल्लोष

मुळशी केसरी २०२५ स्पर्धा उत्साहात संपन्न; मनीष रायते मानकरी

घोटवडे फाटा (ता. मुळशी) : मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने सलग १८व्या वर्षी आयोजित मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ घोटवडे फाटा येथील सुंदरबन लॉनजवळ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. या स्पर्धेमुळे मुळशी तालुक्यात कुस्तीप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. मातीच्या आखाड्यात रंगलेल्या चुरशीच्या लढती पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामांकित तसेच उदयोन्मुख मल्लांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्राथमिक फेऱ्यांपासून अंतिम सामन्यांपर्यंत प्रत्येक लढत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरली. ताकद, चपळाई व तांत्रिक कौशल्याचे दर्शन घडवत मल्लांनी आखाडा गाजवला.

मुळशी केसरीचा मान मनीष रायतेकडे
अंतिम लढतीत दमदार खेळ साकारत मनीष रायते (इंदापूर) याने मुळशी केसरी २०२५चा किताब पटकावला. सागर देवकाते (इंदापूर) याने उपविजेतेपद मिळविले. अविनाश गावडे (इंदापूर) तृतीय, तर अभिजित भोईर (मुळशी) चतुर्थ क्रमांकावर राहिला.
अमृता केसरीचा मान भारत मदने (बारामती) याने मिळविला, तर मुन्ना झुंजुरके (मुळशी) उपविजेता ठरला.

वजनगटांतील विजेते
५७ किलो : स्वप्निल शेलार (बारामती) प्रथम, अथर्व गोळे (पिरंगूट) द्वितीय
६१ किलो : शिवराज पायगुडे (आगळांबे) प्रथम, ओंकार ताठे (भोर) द्वितीय
६५ किलो : अमोल वालगुडे (वेल्हा) प्रथम, युवराज सातकर (मावळ) द्वितीय
७० किलो : योगेश्वर तापकीर (हवेली) प्रथम, अभिजित शेडगे (वेल्हा) द्वितीय
७४ किलो : नामदेव कोकाटे (इंदापूर) प्रथम, शुभम जाधव (दौंड) द्वितीय
(प्रत्येक वजनगटात तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठीही चुरशीच्या लढती रंगल्या.)

मुळशीरत्न पुरस्काराने सन्मान
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सुमित–सुनीता कैलास दाभाडे, दर्शन दत्तात्रय काळभोर व पै. पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ यांना “मुळशीरत्न पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. तसेच आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

विजेत्या व उपविजेत्या मल्लांना रोख बक्षिसे, चषक, मानचिन्हे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. नवोदित मल्लांच्या कामगिरीचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास आमदार शंकर मांडेकर, सह. पोलीस आयुक्त मनोज पाटील, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, हिंद केसरी अमोल चडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या भव्य कार्यक्रमास आमदार शंकर मांडेकर, सह. पोलीस आयुक्त मनोज पाटील, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, हिंद केसरी अमोल चडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये अमित कंधारे, महादेव कोंढरे, शांताराम इंगवले, राजेंद्र डबडे, दगडू काका करंजावणे, दिलीप वेडे पाटील, नगरसेवक बंडू केमसे, मधुर दाभाडे, कुणाल वेडे पाटील, राजाभाऊ वाघ, सचिन खैरे, रामभाऊ गायकवाड, छबुनाथ बेरड, संजय पन्हाळकर, राजाभाऊ इंगवले, सुरेश हुलावळे, मिलिंद वाळुंज, संतोष देशमुख, गोविंद उचगे, युवा नेते सचिन आंग्रे, भानुदास पानसरे, राहुल पवळे, बबनराव दगडे (पो. पाटील), भरत वांजळे, सुनील बांदल, रमेश पवळे, नाना शिंदे, सूर्यकांत भुंडे, बाबुजी वाळंज, धनंजय दगडे, वैभव मुरकुटे, संदीप ढमढेरे, योगेश सोनवणे आदी मान्यवरांचा समावेश होता.

उपस्थित मान्यवरांनी कुस्ती ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असून ग्रामीण भागातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुळशी केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, संस्थापक भास्कर मोहोळ, दत्ता काळभोर, सचिन मोहोळ तसेच सर्व संयोजन समिती, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे मुळशी केसरी २०२५ ही स्पर्धा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!