Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकमंदिरांमधील ‘पेड दर्शन’ सुविधा बंद करा आणि देवस्थानांमध्ये राजकीय नियुक्त्या नकोत !...

मंदिरांमधील ‘पेड दर्शन’ सुविधा बंद करा आणि देवस्थानांमध्ये राजकीय नियुक्त्या नकोत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

मंदिरांमधील ‘पेड दर्शन’ सुविधा बंद करा आणि देवस्थानांमध्ये राजकीय नियुक्त्या नकोत ! –  सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) येथील ज्योतिर्लिंग मंदिर संस्थानमध्ये भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्‍वस्त पुरुषोत्तम कडलग यांसह गोटीराम मनाजी पेहरे अन् अभिषेक कडलग यांना पोलिसांनी अटक केली आहे. येथे २०० रुपयाचा अधिकृत पास असतांना १० मिनिटांत दर्शनाचे आमीष दाखवून भाविकांकडून ३ ते १२ हजार रुपये मागितले जातात, असा प्रकार समोर आला आहे. हाच प्रकार तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात होत असून तेथे २०० रुपये ‘पास’ देऊन विशेष दर्शन दिले जाते. हाच ‘पास’ नवरात्र काळात ३०० रु, ५०० रुपये आणि १ हजार रुपये करण्यात येतो. येथेही अनेक वेळा अतिरिक्त शुल्क घेऊन दर्शनासाठी सोडल्याच्या भक्तांच्या तक्रारी आल्या आहेत. खरेतर ‘सशुल्क दर्शनसेवा’ हा प्रकारच चुकीचा असून यामुळे भाविकांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होते. दूरवरून येणार्‍या ज्या भक्तांकडे पैसे नाहीत त्यांनी काय करायचे?  पैशांअभावी दर्शन नाकारले जाणे हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान आहे आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत घटनात्मक धार्मिक अधिकारावर आणलेली गदा आहे. देवाच्या दृष्टीने गरीब-श्रीमंत सर्व समान असल्याने प्रत्येकासाठी दर्शनाची पद्धत सारखीच असणे अपेक्षित आहे. केवळ उत्पन्न वाढीचा विचार करण्यासाठी मंदिर हे एखादे व्यावसायिक आस्थापन वा दुकान आहे का? त्याचसमवेत अशा पासचा काळाबाजार करण्याची वृत्ती सर्वत्र फोफावत आहे. त्यामुळे नाशिक, तुळजापूरसह राज्यातील सर्वच सरकारीकरण झालेल्या मंदिरांमधील ‘सशुल्क दर्शनसेवा’(पेड दर्शन) सुविधा बंद करावी, अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.

देवस्थानांमधील राजकीय नियुक्त्या बंद करा !

जेव्हा मंदिरे सरकार किंवा राजकीय नियुक्त्या असलेल्या समित्यांच्या कह्यात जातात, तेव्हा तिथे भक्तीऐवजी व्यापारी वृत्तीचा शिरकाव होतो. त्र्यंबकेश्‍वरमधील ही घटना म्हणजे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणामच होय. ‘अतिथी देवो भव ।’ मानणार्‍या भूमीत भाविकांना लुबाडण्यासाठी विश्‍वस्तांनीच यंत्रणा चालवावी, यासारखे दुसरे दुर्दैव नाही ! त्र्यंबकेश्‍वर देवस्थानातील विश्‍वस्त नियुक्तीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी विश्‍वस्तांनी केला आहे. त्यामुळे या ‘पेड’ दर्शनाची सखोल चौकशी करून यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचेही अन्वेषण व्हावे, अशी मागणी मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. यापुढील काळात असे प्रकार टाळण्यासाठी देवस्थानांमध्ये विश्‍वस्त म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी यांची नियुक्ती करण्याऐवजी तिथे देवाचा भक्त-भाविक म्हणून नेमणूक होणे आवश्यक आहे आणि यापुढे तसा बदल देवस्थानच्या घटनेत करावा, अशी मागणी मंदिर महासंघाच्या वतीने  करत आहोत.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!