Homeमुळशीपेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिरंगुट : चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.

यानंतर विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट, सूर्यनमस्कार, एम.पी.टी., देशभक्तीपर गीत, घुंगरू काठी नृत्य तसेच तायक्वांदो प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अंतरा रायरीकर, दिव्या राऊत व दूर्वा पवळे यांच्या देशप्रेमाने भारावलेल्या भाषणांनी कार्यक्रमास विशेष रंगत आणली.

कार्यक्रमादरम्यान विविध क्रीडा व उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्रीडा गौरव समारंभ पार पडला. वर्षभर राबविण्यात आलेल्या हाऊस स्पर्धांच्या आधारे ‘ऋग्वेद हाऊस’ ने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली. विजेत्या हाऊसच्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी ‘यजुर्वेद हाऊस’च्या शिक्षकांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. वैभव मुरकुटे, मा. श्री. बाळासाहेब विचारे तसेच श्री. योगेश सोनवणे (संचालक) उपस्थित होते. संचालिका सौ. रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर यंग डायरेक्टर श्री. यश बांदल यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल, तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार व पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

समारोपप्रसंगी मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये रुजवण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शनानंतर ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!