Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकदिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन !

दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन !

 ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त होणार ‘शौर्याचा शंखनाद’!

                              नवी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘भारत मंडपम्‌’ (इंद्रप्रस्थ) येथे १३ व १५ डिसेंबर रोजी आयोजित होत असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे २५० हून अधिक दुर्मिळ आणि ऐतिहासिक शस्त्रे दिल्लीमध्ये प्रदर्शित होत आहेत. ही सर्व शस्त्रे महाराष्ट्रातून विशेष सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला आणली जात असून राजधानीत अशा ऐतिहासिक स्वरूपाचे शस्त्रप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. ‘सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित महोत्सवात या शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाद्वारे ‘शौर्याचा शंखनाद’ होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली आहे.
                              सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशाच्या राजधानीत होणाऱ्या महोत्सवात दिनांक १३ ते १५ डिसेंबर या तीन दिवसांच्या ‘स्वराज्याचा शौर्यनाद’ या नावाचे भव्य प्रदर्शन लावण्यात येणार आहे. हे प्रदर्शन हॉल क्रमांक १२ मध्ये सर्वांसाठी खुले राहील. या प्रदर्शनीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हाताळलेल्या अनेक शस्त्रांचे साक्षात दर्शनही घेता येईल. यासमवेतच अन्य मराठा साम्राज्यातील सेनापतींनी चालवलेली शस्त्रे असणार आहेत. त्यात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भाला यांसारखी विविध शस्त्रे असतील.
        तसेच महाराणा प्रताप यांच्या काळातील शस्त्रांसह कर्नाटकातील विजयनगर साम्राज्यकालीन तलवारी, शिवकालीन युद्धपरंपरा, धातूशास्त्र, ‘लोखंड ते शस्त्र’ या संकल्पनेवर आधारित मराठा शस्त्रनिर्मिती प्रक्रिया आणि मराठा सामरिक बुद्धिमत्तेचे दर्शन यांचा समावेश असेल. तसेच हिंदू स्त्रियांनी आत्मरक्षणासाठी वापरलेल्या शस्त्रांचेही प्रदर्शन होणार असून त्या काळातील स्त्रियांची रणशक्ती आणि युद्धातील भूमिका अधोरेखित केली जाणार आहे. हे केवळ प्रदर्शन नसून हिंदवी स्वराज्याच्या तेजातून ‘सनातन राष्ट्रा’ची नवी प्रेरणा देणारा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे.
या महोत्सवात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय शेठ, दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा, छत्रपती खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले, अधिवक्ता विष्णू जैन यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ कार्यक्रम नसून राष्ट्ररक्षण, संस्कृती, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजाचे पुनरुज्जीवन आहे. आजच्या काळातील विविध सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शिवकालीन शस्त्रे, युद्धकला आणि राष्ट्रधर्म यांची आठवण तरुणांना नवचैतन्य देणारी ठरेल. सर्व हिंदूंसाठी हा महोत्सव विशेष अभिमानाचा क्षण आहे.
        हा महोत्सव पाहण्यासाठी व यात सहभागी होण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन असेही श्री. अभय वर्तक यांनी केले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!