Homeपुणे / पिंपरी-चिंचवडसनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!

आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही – श्री चैतन्य तागडे

पुणे – संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर मात करण्यासाठी भौतिक उपायांपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान आवश्यक आहे. समाजाला दिशा देण्यासाठी आणि ‘रामराज्य’ स्थापनेसाठी साधनेला पर्याय नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. चिंचवड येथील ‘जी. एम. के. बँक्वेट्स अँड लॉन्स’ येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. सनातन संस्थेच्या वतीने यंदा विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर पुणे जिल्ह्यात चिंचवडसह तळेगाव, कोथरूड, हडपसर, जुन्नर, सातारा रस्ता, भोर, सिंहगड रस्ता अशा एकूण ८ ठिकाणी हा महोत्सव अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाचा लाभ ४००० हून अधिक भाविकांनी घेतला.

हिंदुत्वाचे कार्य करणारा कार्यकर्ता कसा असावा, याचा आदर्शच सनातनच्या साधकांनी आपल्या आचरणातून घालून दिला आहे. – श्री. सर्वेश मेहेंदळे, सामाजिक विश्लेषक

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये काम करताना कार्यकर्त्यांचा ‘अहंकार’ ही मोठी समस्या जाणवते. याउलट सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या साधकांमधील सात्त्विक तेज व अद्वितीय विनम्रता पाहून मन भारावून जाते. साधकांच्या या दैवी नम्रतेतूनच मला प्रेरणा मिळते आणि ‘देव, देश अन् धर्म’ रक्षणासाठी अविरत कार्य करण्याची आध्यात्मिक शक्ती मिळते असे मत सामाजिक विश्लेषक श्री. सर्वेश मेहेंदळे यांनी या वेळी चिंचवड (रावेत ) येथे व्यक्त केले.

आजच्या काळात देशविघातक आणि विभाजनवादी शक्तींचा बीमोड केल्याशिवाय ‘रामराज्य’ किंवा ‘ईश्वरी राज्य’ प्रस्थापित होऊ शकत नाही असे परखड प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू श्री.सात्यकी सावरकर यांनी श्रुती मंगल कार्यालयात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे श्री.पराग गोखले आणि श्री. नागेश जोशी, श्री. दीपक आगवणे, कु. क्रांती पेटकर, सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे, सौ. ज्योती दाते, डॉ.ज्योती काळे, श्री. केतन पाटील यांनीही उपस्थिताना संबोधित केले.

पुस्तक प्रकाशन !
डेक्कन जिमखाना, पुणे येथील ‘श्रुति मंगल कार्यालया’त ‘स्वभावदोष निर्मूलन आणि गुणवृद्धी’ आणि ‘प्रार्थना’ या २ इबुकचे प्रकाशन सात्यकी सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तर सामाजिक विश्लेषक श्री. सर्वेश मेहेंदळे आणि श्री चैतन्य तागडे यांच्या हस्ते ‘सच्चिदानंद परब्रम्ह डॉ.जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

विविध उपक्रम आणि आवाहन !
महोत्सवात व्यासपूजन, गुरुपूजन, लघुपट दर्शन, स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके, धर्मरक्षकांचा सत्कार आणि ‘रामराज्य’ स्थापनेचा संकल्प करण्यात आला. आगामी भीषण आपत्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता, सर्व हिंदूंनी प्रथमोपचार, अग्निशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.तसेच देश-विदेशातील हजारो भाविकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून महोत्सवाचा लाभ घेतला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

भाजप नेत्याची मुलगी म्हणाली- जोशींना शिक्षणमंत्री बनवणे हा विनोद:यूपीमध्ये वडील आमदार होते; CJP आंदोलनात...

0
जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात छेडछाडीचा दावा करणाऱ्या यशस्वी राजे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. यशस्वी यांनी...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
spot_img

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...
error: Content is protected !!