छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे मुळशीत आगमन; ग्रामस्थांत उत्साहाचे वातावरण
मुळशी (कासार आंबोली) : रायगड येथून पंढरपूरकडे निघालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी कासार आंबोली येथे समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
या सोहळ्याच्या स्वागतासाठी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी शिवभक्तीचा जागर केला. विशेष म्हणजे या स्वागत सोहळ्यात शिवभक्त संदीप महिम आणि सहभागी शिवभक्तांचे स्वागत भारतीय विद्यार्थी सेनेचे पुणे जिल्हा संघटक राम गायकवाड, सामाजिक न्याय विभाग मुळशी तालुका अध्यक्ष भाऊ केदारी, माजी सरपंच सचिन धुमाळ, तसेच पिरंगुटचे माजी उपसरपंच लक्ष्मण निकटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन चिंतामण शिंदे, संदीप शिंदे, सनी राऊत, निलेश शिंदे आणि वैशाली शिंदे यांनी केले होते. यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची खास व्यवस्था श्री चिंतामण शिंदे व सौं. वैशाली शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आली.
या सोहळ्यामुळे परिसरात ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.

































