Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकआनंदी जीवनासाठी गुरुकृपेचे महत्व

आनंदी जीवनासाठी गुरुकृपेचे महत्व

प्रस्तावना

गुरू हे जीवनाला योग्य दिशा देणारे असतात. श्री दत्तगुरूंनी जसे २४ गुणगुरु केले, तसे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक प्रसंगातील गुण पाहण्याची दृष्टी गुरू देतात. परंतु आपण बहुधा स्वतःतील आणि इतरांतील गुणांकडे न पाहता स्वभावदोष व उणिवांकडेच लक्ष देतो. त्यामुळे जीवनातील आनंदाचे अनेक क्षण अनुभवण्यापासून वंचित राहतो. प्रत्यक्ष आनंदी जीवन जगण्यासाठी श्री दत्तगुरूंप्रमाणे प्रत्येकातील गुण पाहण्याची वृत्ती आवश्यक आहे. गुरुकृपायोगानुसार व्यक्तीतील स्वभावदोष आणि अहं कसे दूर होतात, तसेच आनंदमय जीवनाकडे वाटचाल कशी होते, यासंदर्भात माहिती सनातन संस्थेने संकलित केलेल्या या लेखातून पाहू.

गुरुकृपेचे महत्त्व

श्री गुरुचरित्र (१३:१३०) मध्ये म्हटले आहे, “गंगेमुळे पाप, शशीमुळे ताप आणि कल्पतरूमुळे दैन्य नाहीसे होते; परंतु श्रीगुरूंच्या दर्शनाने पाप, ताप आणि दैन्य या तिन्हींचे हरण होते.” गुरु जीवाला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरुकृपेमुळे साधकाच्या जीवनात अंतर्मुखता, सात्त्विकता आणि आत्मिक आनंद निर्माण होतो. ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसल्याने ईश्वराशी एकरूप होण्यासाठी स्वतःतील स्वभावदोष व अहं दूर करणे आवश्यक आहे. साधनेमुळे मन शुद्ध होऊन सूक्ष्मदृष्टी जागृत होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनतो. हे गुरुकृपेने साध्य होत.

अष्टांग साधना

नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्‌साठी त्याग, निरपेक्ष प्रेम, स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि भाववृद्धी हे गुरुकृपायोगातील अष्टांग साधनेचे टप्पे आहेत. यामुळे आध्यात्मिक उन्नती होते.  “सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार होवो” हा भाव अष्टांग साधनेने साधकात निर्माण होतो.

 

आजच साधना सुरू करा

तरुणांनी वृद्धापकाळाची वाट न पाहता तरुण वयातच साधना आरंभ करावी; कारण मनुष्यजन्माचा खरा उद्देश ईश्वरप्राप्ती हा आहे. वृद्धापकाळात विविध व्याधीं सुरू झाल्याने तिकडेच लक्ष अधिक असत. त्यावेळी व्याधी सुसह्य होण्यासाठी साधना आवश्यक आहे. गुरुकृपेच्या बळावर साधक आनंदमय जीवन जगण्यास सक्षम होतो.

गुरुतत्त्वाच्या चरणी प्रार्थना

अशा प्रकारे गुरुकृपायोगातील अष्टांग साधनेने साधकाला स्वभावदोष व अहं-निर्मूलनातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने नेऊन कलियुगातील अस्थिर जीवनात चिरंतन आनंद मिळतो. म्हणूनच गुरुकृपायोग हा केवळ साधनेचा मार्ग नसून आनंदमय आदर्श जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

आपल्यातील स्वभावदोष आणि अहं दूर करून जीवनातील प्रत्येक क्षणाचा खरा आनंद अनुभवणे, हीच गुरुकृपा आहे. या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुतत्त्वाच्या चरणी आपण प्रार्थना करूया— “हे भगवंता, हे गुरुमाऊली, आम्हाला जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवता येऊ दे. त्यासाठी आमच्यातील स्वभावदोष आणि अहं दूर करण्याची शक्ती, तळमळ आणि सातत्यपूर्ण साधना करण्याची प्रेरणा आम्हाला द्या.”

संदर्भ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

संकलक : प्रा.विठ्ठल जाधव, सनातन संस्था.

संपर्क क्रमांक : 7038713883

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!