Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांक‘हलाल’ प्रमाणित ‘मेंटोस’ गोळ्या हिंदुत्वनिष्ठांनी कोल्हापुरातील दुकानातून हटवल्या !

‘हलाल’ प्रमाणित ‘मेंटोस’ गोळ्या हिंदुत्वनिष्ठांनी कोल्हापुरातील दुकानातून हटवल्या !

 

दिवाळीच्या निमित्ताने संदेश देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनी हलाल प्रमाणित उत्पादने आतंकवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देत असल्याने त्या हलाल उत्पादनांवर बंदी घालण्याबाबत विधान केले होते. त्यानंतर आज कोल्हापूर शहरातील ‘येवलेज मिल्क कॉर्नर’ या दुकानात मुस्लिमबहुल देश इंडोनेशिया येथून आयात केलेल्या आणि ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या ‘मेंटोस’ गोळ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

ही माहिती मिळताच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी तत्काळ संबंधित दुकानदाराची भेट घेतली आणि त्यांना ‘हलाल प्रमाणपत्र’ ही पद्धत भारतीय समाजासाठी कशी घातक आहे तसेच त्यातून मिळणारा निधी अप्रत्यक्षपणे देशविरोधी कारवायांसाठी कसा वापरला जातो, हे समजावून सांगितले.

हे ऐकल्यानंतर दुकानदाराने तात्काळ ‘हलाल प्रमाणित मेंटोस’ गोळ्या दुकानातून हटवल्या आणि पुढे कोणत्याही ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या वस्तू विक्रीस ठेवणार नसल्याचे आश्वासन दिले. या येवलेज मिल्क कॉर्नरचा आदर्श घेऊन इतर राष्ट्रप्रेमी दुकानदारांनीही आपापल्या दुकानातील हलाल उत्पादनंवर बहिष्कार घातला पाहिजे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले.

या प्रबोधन मोहिमेत हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, प्रीतम पवार, विश्वास पाटील तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सचिन भोसले आणि अशोक गुरव आदी उपस्थित होते.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कथा: व्यापाऱ्याला सेवकाची शिकवण:एक छोटीशी चूक आपल्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, प्रत्येक परिस्थितीत...

0
एक लोककथा आहे. एका राज्यात एक अत्यंत कुशल व्यापारी होता. त्याची बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि व्यवस्थापन क्षमता अद्भुत होती. राजा देखील त्याच्या योग्यतेने प्रभावित...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

0
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी...

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...
spot_img

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
error: Content is protected !!