Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकसारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही; पुण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही; पुण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश काढा; प्रशासकीय अपयशाचा आंदोलकांकडून निषेध

पुणे – ऐतिहासिक आणि समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या सारसबाग व श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी आज हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. रमजानच्या काळात या परिसरात झालेल्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय अपयशाचा निषेध करण्यासाठी आणि सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ न देण्याचा निर्धार करत आज येथे विविध हिंदू संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ उत्स्फूर्तपणे पार पडले. या वेळी आंदोलकांनी आगामी २७ मे रोजीच्या बकरी ईदसाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची आग्रही मागणी प्रशासनाकडे केली.
२२ मार्च रोजी रमजानच्या काळात हजारोंच्या संख्येने येथे जमाव गोळा होणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. पेशवेकालीन वारसा लाभलेल्या या पवित्र स्थळाची सुरक्षा राखण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. “ही सारसबाग आहे की शाहीनबाग?” असा संतप्त सवाल या वेळी उपस्थित करत या घटनेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
आंदोलनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये २२ मार्चच्या गर्दीला परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, आगामी काळात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.सारसबाग मंदिर परिसरात कोणत्याही बिगर-हिंदू सामूहिक कार्यक्रमांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.२७ मे रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या काळात सारसबागेत गर्दी, मांसाहार किंवा कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश त्वरित काढावेत. या घटना म्हणजे केवळ योगायोग नसून पद्धतशीर धार्मिक अतिक्रमणाचे संकेत आहेत, त्यामुळे शासनाने याकडे अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहावे.
या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे श्री. दादा वेदक,  स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे श्री. विद्याधर नारगोलकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे श्री दयानंद बंडगर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन, सामूहिक आरतीने आंदोलनाची सांगता करण्यात आली.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!