Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकवारीतील 'बनावट अभंग' आणि धर्मांतराचे षड्यंत्र; हिंदु जनजागृती समिती आक्रमक

वारीतील ‘बनावट अभंग’ आणि धर्मांतराचे षड्यंत्र; हिंदु जनजागृती समिती आक्रमक

विभागीय आयुक्तांचे दोषींवर कायदेशीर कारवाईचे आश्‍वासन!

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता असलेल्या पवित्र पंढरीच्या वारीत आणि ससूनसारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये विशिष्ट धर्मांध गटांकडून धर्मांतराचे आणि वारकऱ्यांचा बुद्धीभेद करण्याचे पद्धतशीर षड्यंत्र राबवले जात असल्याचा गंभीर आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे. या गैरप्रकारांना त्वरित आळा घालून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी समितीचे समन्वयक श्री. पराग गोखले, सर्वश्री कृष्णाजी पाटील, सचिन घुले आणि अन्य कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त सौ. शीतल तेली-उगले यांची भेट घेतली. त्यांना या षड्यंत्राचे सविस्तर निवेदन दिले असून, यावर सकारात्मक प्रतिसाद देत विभागीय आयुक्तांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
रुग्णालयातील गरीब रुग्ण आणि निष्पाप वारकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. जुलै महिन्यात ससून रुग्णालयाबाहेर सुनील आणि प्रतिभा वर्गीस या ख्रिस्ती दाम्पत्याला कर्करोग केवळ येशूच्या प्रार्थनेने बरा होईल, अशा अंधश्रद्धा पसरवून धर्मांतराचा प्रयत्न करताना रंगेहात पकडण्यात आले होते. दुसरीकडे, वारीच्या पवित्र मार्गावर वारकऱ्यांचा बुद्धीभेद करण्यासाठी बायबलमधील तत्त्वज्ञान संतांच्या नावे खपवून ‘बनावट अभंग’ आणि ‘कृपा संगम’सारख्या हस्तपुस्तिका वाटल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर, अहिल्यानगरसारख्या भागात ‘मतमाऊली वारी’ आणि ‘येशूनाम सप्ताह’ आयोजित करून, दिंडी आणि टाळ-मृदंगाचा वापर करत मूळ वारकरी परंपरेची हुबेहूब नक्कल करत भाविकांची मोठी फसवणूक केली जात असल्याकडे समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या धर्मांतराच्या प्रयत्नांसोबतच पालखी मार्गांवर ‘अल्लाविना कुणी देव नाही’ असे प्रक्षोभक उर्दू फलक लावून जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. डिजिटल माध्यमांतूनही संतांच्या नावे बनावट अभंगांचे रिल्स प्रसारित करून सायबर षड्‍यंत्र राबवले जात आहे. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा (अंनिस) कार्यकर्ता प्रशांत कांबळे ऊर्फ लॅपटॉप कांबळे याला नक्षलवाद्यांशी थेट संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे एटीएसने मागील वर्षी अटक केली आहे. अशा देशविघातक विचारसरणीचे लोक पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून वारीत घुसतात आणि वारकऱ्यांची दिशाभूल करतात, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या सर्व गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अत्यंत कठोर ‘धर्मांतरविरोधी कायदा’ तातडीने लागू करावा, अशी प्रमुख मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच संशयास्पद साहित्य वाटणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९, ३०२ आणि ३१८ नुसार तात्काळ गुन्हे दाखल करावेत, रुग्णालयांबाहेर साध्या वेशातील पोलीस तैनात करावेत आणि देशविघातक कृत्यांत आढळलेल्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना वारीत प्रवेश नाकारावा, असे श्री. घनवट यांनी सांगितले आहे.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते:लोकशाहीत आंदोलने होत राहतील; गरजेपेक्षा जास्त बळाचा...

0
निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने म्हटले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते, जे घटनात्मक चौकटीत...

पेट स्कॅन चाचणी आता 3 हजारांत:शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करुग्णांना मोठा दिलासा

0
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात 'पेट स्कॅन' चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आता कर्करुग्णांना १५,४८७ रुपयांऐवजी केवळ ३,००० रुपये मोजावे...

चंदीगड न्यायालयात दीपके-वांगचुक, कामरा यांच्यावर FIR ची मागणी:वकिलाची याचिका- जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलनात अपमानकारक...

0
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर, चंदीगडमध्ये पर्यावरणवादी सोनम वांगचुक, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...
spot_img

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...

नकारात्मक विचारांना हरवेल ‘ब्रॅग फोल्डर, येथे जमा करा यश:मेंदू पराभव लक्षात ठेवतो, विजय नाही;...

0
कधी लक्ष दिलं आहे का... फोनच्या गॅलरीमध्ये जुन्या पावत्या, निरुपयोगी स्क्रीनशॉट्स आणि अनेक वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे फोटो भरलेले असतील. पण जर तुम्हाला विचारलं की...

कंगना म्हणाली- जेन-झी आंदोलनाच्या रील्स पाहून उलटी येते:यांची कशी वाढ होत आहे; ‘कॉकरोच’सारखे वागून...

0
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर निशाणा साधला आहे. कंगनाने...
error: Content is protected !!