Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकभारत तसेच हिंदु विरोधी हलाल अर्थव्यवस्थेचा संघटित विरोध करण्यासाठी पुणे येथे धर्मप्रेमींचे...

भारत तसेच हिंदु विरोधी हलाल अर्थव्यवस्थेचा संघटित विरोध करण्यासाठी पुणे येथे धर्मप्रेमींचे मूकनिदर्शन ! 

‘हलाल मुक्त दिवाळी’ साठी देशव्यापी अभियान; अवैध हलाल अर्थव्यवस्थेवर बंदी घालण्याची मागणी !

 
पुणे – खाद्यपदार्थ आणि अन्य उत्पादनांवर दिल्या जाणाऱ्या अवैध ‘हलाल प्रमाणपत्रां’च्या विरोधात यंदा देशभरात ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान राबवण्यात येत आहे. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’, ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि अन्य समविचारी संघटनांनी एकत्र येत या देशव्यापी अभियानाची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने रविवार १२ ऑक्टोबर या दिवशी गणपती चौक (रजनीगंधा साडी सेंटर), लक्ष्मी रस्ता, पुणे येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांच्या वतीने हलाल प्रमाणित उत्पादनांवर तसेच प्रमाणपत्रावर बंदी यासाठी मुकनिदर्शन आंदोलन करण्यात आले. अशाच प्रकारचे आंदोलन  पारगाव सा. मा. आणि केडगाव येथेही करण्यात आले. ‘यंदाची दिवाळी हलाल मुक्त दिवाळी’, ‘हलाल’ प्रमाणपत्राचा शिक्का असलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी करू नका , ‘हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ आतंकवाद्यांना कायदेशीर मदत करते, हे लक्षात घ्या !’, असे प्ल कार्ड हातात घेऊन धर्मप्रेमींनी निदर्शने केली.
       या अभियानांतर्गत देशभरात ‘हलाल सक्ती विरोधी आंदोलने’, व्यापारी बैठका, मंडळ बैठका, जागृतीपर फलक, व्याख्याने, हस्तपत्रकांचे वितरण आणि ऑनलाईन याचिकांद्वारे व्यापक जनजागृती केली जात आहे. ‘केंद्र शासनाने हलाल सर्टिफिकेशन’ व्यवस्था बंद करण्यासाठी ‘हलाल मुक्त दिवाळी’ या अभियानांतर्गत समाजातील नागरिकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने प्रचोधनात्मक स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यावेळी हलाल सर्टिफिकेशन बाबत नागरिकांमध्ये विषय सांगून जागृती करण्यात आली. त्याला समाजातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कित्येकांनी हा विषय माहित नसल्याचे सांगितले तसेच आता ‘हलाल’ प्रमाणपत्राचा शिक्का असलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी करणार नाही असे उपस्थितांनी सांगितले. केवळ दिवाळीपुरते मर्यादित न राहता, ‘हलाल मुक्त भारत’ होईपर्यंत हा लढा सातत्यपूर्ण रितीने चालू ठेवण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कथा: व्यापाऱ्याला सेवकाची शिकवण:एक छोटीशी चूक आपल्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, प्रत्येक परिस्थितीत...

0
एक लोककथा आहे. एका राज्यात एक अत्यंत कुशल व्यापारी होता. त्याची बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि व्यवस्थापन क्षमता अद्भुत होती. राजा देखील त्याच्या योग्यतेने प्रभावित...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

0
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी...

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...
spot_img

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
error: Content is protected !!